फोंडशिरसचे सरपंच पोपटराव बोराटे यांचा अपघात की घातपात, तर्कवितर्क चर्चा सुरू आहे….
फोंडशिरस (बारामती झटका)
फोंडशिरस ता. माळशिरस गावचे कर्तव्यदक्ष व कार्यक्षम सरपंच पोपटराव बोराटे यांचा अपघात की घातपात, असे तर्कवितर्क चर्चा सुरू आहे.
फोंडशिरस गावचे सरपंच पोपटराव बोराटे यांचे फोंडशिरस येथे दुकान व्यवसाय आहे. नेहमीप्रमाणे सायंकाळी दुकानामधून घराकडे फोंडशिरस-पिरळे रस्त्यावर वस्ती आहे, घराकडे सायंकाळी मोटरसायकलवर जात असताना समोरून चार चाकीची धडक होऊन मोठ्या प्रमाणात डोक्याला मार लागलेला आहे. जवळ जवळ 45 टाके पडलेले आहेत. चार चाकी वाहन धडक देऊन निघून गेलेले आहे.
त्यामुळे अपघात की घातपात, अशी चर्चा सुरू आहे. कारण सध्या मस्साजोग जे सरपंच देशमुख प्रकरण महाराष्ट्रात गाजत असताना फोंडशिरस गावचे सरपंच पोपटराव बोराटे यांच्या अपघाताची शंका उपस्थित केली जात आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी दवाखान्यात जाऊन तब्येतीची विचारपूस करून पोलीस प्रशासनांना योग्यती चौकशी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. नातेवाईक यांना घातपात असल्याची शंका उपस्थित केली जात आहे. पोलीस प्रशासन सी सी कॅमेरे व गोपनीय माहिती आधारे चौकशी सुरू केलेली आहे.
सध्या सरपंच पोपटराव बोराटे यांची प्रकृती स्थिर असून तब्येतीमध्ये सुधारणा होत आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.