ह. भ. प. पुनमताई साळुंखे महाराज यांचे वटपौर्णिमेनिमित्त एकमुखी दत्त मंदिर येथे सुश्राव्य कीर्तन होणार आहे…

अकलूज (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील तांबवे हद्दीतील अकलूज-टेंभुर्णी रोडवरील एकमुखी दत्त मंदिर पायरी पुल येथे वटपौर्णिमेनिमित्त शुक्रवार दि. २१/६/२०२४ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेमध्ये ह. भ. प. पुनमताई साळुंखे महाराज यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. तरी भाविकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.
एक मुखी दत्त मंदिर येथे दिवसेंदिवस भाविकांची वर्दळ वाढत चाललेली आहे. सदरच्या ठिकाणी दर गुरुवारी व पौर्णिमेला मोठ्या प्रमाणात अन्नदान भाविकांकडून केले जात आहे. दत्तभक्त आबासाहेब साळुंखे यांच्या अथक प्रयत्नातून सदरच्या ठिकाणी मंदिराची उभारणी लोकवर्गणीतून केलेली आहे. स्वच्छ, सुंदर व निसर्गरम्य परिसर असल्याने भाविकांचे श्रद्धास्थान बनलेले आहे.


वटपौर्णिमेनिमित्त साधून ह. भ. प. पुनमताई साळुंखे महाराज यांची किर्तन सेवा आयोजित केलेली आहे. या दिवशी महिलांचा मोठा उत्सवाचा व आनंदाचा दिवस असल्याने महिलांची उपस्थिती लक्षणीय राहणार आहे. तसेच यावेळी पुष्पवृष्टी व आरती झाल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे. तरी भाविकभक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन एकमुखी दत्त मंदिर संयोजन समितीच्या वतीने करण्यात आलेले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.