ताज्या बातम्यासामाजिक

ह. भ. प. सौ. अश्विनीताई महाराज मासाळ, मोरगाव यांचे भांबुर्डी येथे सुश्राव्य कीर्तन होणार…

भांबुर्डी गावचे प्रगतशील बागायतदार स्व. जगन्नाथ सोपान वाघमोडे यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त कीर्तन, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन…

भांबुर्डी (बारामती झटका)

भांबुर्डी, ता. माळशिरस गावचे प्रगतशील बागायतदार स्वर्गीय जगन्नाथ सोपान वाघमोडे यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त सोमवार दि. 02/11/2026 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत ह. भ. प. अश्विनीताई महाराज मासाळ (मासाळवाडी), मोरगाव यांचे सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन भांबुर्डी (जाधव वस्ती नजीक येळीव मायनर फाटा) येथे करण्यात आले आहे.

मित्र परिवार व नातेवाईक यांनी उपस्थित रहावे असे श्रीमती मुक्ताबाई जगन्नाथ वाघमोडे, श्री. शंकर जगन्नाथ वाघमोडे, सौ. रुक्मिणी शंकर वाघमोडे, श्री. शहाजी जगन्नाथ वाघमोडे, सौ. सुनीता शहाजी वाघमोडे, श्रीमती सीताबाई व श्रीमती लक्ष्मी शिवाजी वाघमोडे व समस्त वाघमोडे परिवार भांबुर्डी यांच्या वतीने उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन करण्यात येत आहे…

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button