ताज्या बातम्यासामाजिक

मोठी ब्रेकिंग न्यूज : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे काय?

सोलापूर (बारामती झटका)

महाराष्ट्र सरकारने दुष्काळामुळे सहकारी संस्थांची निवडणूक घेणे लोकहिताचे नसेल. अशा बाबतीत राज्य शासनास सर्वसाधारण किंवा विशेष आदेशाद्वारे सहकारी संस्थांची निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक ही उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सुरू असून या निवडणुकीच्या नामनिर्देशन पत्र विक्री आणि स्वीकृतीचे तीन दिवस झाल्याने ही निवडणूक पुढे जाणार नाही, तिची प्रक्रिया सुरू राहील, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक मुकुंद पवार यांनी दिली.

राज्याच्या सहकार विभागाने काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील कलम ७३ क मधील तरतुदीनुसार टंचाई, अवर्षण, पुर, आग किंवा इतर कोणत्याही नैसर्गिक आपत्ती किंवा पावसाळा यामुळे किंवा टंचाई, अवर्षण, पुर, आग, गारपीट किवा इतर कोणतीही नैसर्गिक आपत्ती यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी, शेतमजुर किंवा इतर व्यक्ती बाधित झाल्यामुळे मतदारांच्या संख्येत घट झाल्याने आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी केलेल्या कोणत्याही शासकीय योजनेच्या अंमलबजावणीमुळे मतदारांची संख्या वाढण्याचा संभव असल्यामुळे राज्य शासनाच्या मते सहकारी संस्थांची निवडणूक घेणे लोकहिताचे नसेल. अशा बाबतीत राज्य शासनास सर्वसाधारण किंवा विशेष आदेशाद्वारे सहकारी संस्थांची निवडणूक पुढे ढकलण्याचा अधिकार आहे.

शासनास प्राप्त असलेल्या अधिकारानुसार राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा विचार करून सहकारी संस्थांची निवडणूक पुढे ढकलण्याबाबत शासन खालीलप्रमाणे आदेश देत आहे –
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील कलम ७३क मधील तरतुदीनुसार सद्यस्थितीत राज्यात शासनाने दुष्काळी परिस्थिती जाहिर केल्यामुळे सहकारी गृहनिर्माण संस्था तसेच ज्या प्रकरणी मा. उच्च न्यायालय / मा. सर्वोच्च न्यायालयाने सहकारी संस्थेची निवडणूक घेण्याबाबत आदेशीत केले आहे. अशा सहकारी संस्था वगळून तसेच ज्या सहकारी संस्थांच्या निवडणूकीचा नामनिर्देशनाचा टप्पा सदर आदेशाच्या दिनांकापूर्वी सुरु झाला आहे, अशा सहकारी संस्था वगळून शासनाने दुष्काळ जाहिर केलेल्या जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांची निवडणुक सध्या ज्या टप्प्यावर आहे त्या टप्प्यावरुन या आदेशाच्या दिनांकापासून पुढील आदेशापर्यंत पुढे ढकलण्यात येत आहेत.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button