हा देश शेतकऱ्यांवर चालतो – आ. रामभाऊ सातपुते
मुंबई (बारामती झटका)
सध्या सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात माळशिरस तालुक्याचे आ. रामभाऊ सातपुते यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार थांबविण्याची मागणी केली.
30-40 वर्षांपूर्वी वन विभागाच्या हद्दीतून शेतकरी बांधवांच्या पाईप लाईन गेल्या आहेत. पण कोणीतरी अर्ज करतो आणि या पाईपलाईन उखडून फेकल्या जातात. त्यामुळे शेतकऱ्याने कष्टाने, घामाने पिकवलेलं पीक त्याच्या डोळ्यासमोर जळतं, हे पाहून खूप दुःख होतं, अशा प्रकारे शेतकऱ्यांना त्रास देणे चुकीचे आहे. त्यामुळे असे प्रकार थांबले पाहिजे, याविषयी विधानसभेत आमदार रामभाऊ सातपुते यांनी आवाज उठवला व संबंधित वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सदर प्रकार थांबवण्याचे तातडीने निर्देश द्यावे, अशी मागणी केली.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
This was both informative and hilarious! For further reading, check out: LEARN MORE. What do others think?