शासनाने दुधाला जाहीर केलेले अनुदान द्यावे – आ. राम सातपुते
मुंबई (बारामती झटका)
माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आ. रामभाऊ सातपुते यांनी सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या ५ रुपये अनुदानाची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी यासाठी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला.
शासनाने दुधाला पाच रुपये लिटर अनुदान जाहीर केले आहे परंतु, त्याची अद्यापही प्रभावीपणे अंमलबजावणी होताना दिसत नाही. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना गाई, म्हशींना टॅग मारण्याचे आदेश दिले. टॅग मारुन झाले. शेतकऱ्यांनी आपले बँक खात्याची माहिती दिली पण, अद्यापही अनुदानाची कसल्याही प्रकारची अमंलबजावणी झालेली नाही.
पहाटे चार वाजल्यापासून रात्री झोपेपर्यंत गाई, म्हशी शेतकरी सांभाळत असतो. एक लिटर दुधासाठी पंचवीस ते तिस रुपये खर्च येतो. आपण शासन पाच रूपये अनुदान देतो. हे अनुदान तुटपुंजे आहे. पण, अधिकारी केवळ कागदी घोडे नाचवत असल्याने शेतकऱ्यांना अद्यापही अनुदान मिळाले नाही.
शासनाने ताबडतोब यामध्ये लक्ष घालुन कोणत्याही प्रकारचे आढेवेढे न घालता शेतकऱ्यांच्या खात्यात थेट अनुदान जमा करावे, याची आपण प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अशी मागणी सध्या सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात माळशिरस तालुक्याचे आ. रामभाऊ सातपुते यांनी करीत सरकारचे शेतक-यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.