हौसेला मोल नसते; भव्य दिव्य गावदेव मिरवणूक रील स्टार काळी मैना “करीना काळे” यांच्या उपस्थितीत होणार….
माळशिरस (बारामती झटका)
स्वर्गीय शंकर लक्ष्मण पवार यांचे नातू व श्री. नाना शंकर पवार रा. मेडद, ता. माळशिरस, जि. सोलापूर, यांचे द्वितीय चिरंजीव गणेश आणि स्वर्गीय भगवान बंडू धुमाळ यांची नात व श्री. दत्तात्रय भगवान धुमाळ रा. सिद्धेश्वर निंबोडी, ता. बारामती, जि. पुणे, यांची ज्येष्ठ कन्या चि. सौ. कां. प्राजक्ता यांचा शाही शुभविवाह सोहळा रविवार दि. 19 जानेवारी 2025 रोजी दुपारी 12 वाजून 49 मिनिटे या शुभमुहूर्तावर चैतन्य लॉन्स, मु. पो. शिंदेवाडी, ता. माळशिरस येथे संपन्न होणार आहे.
शनिवार दि. 18 जानेवारी 2025 रोजी मेडद, ता. माळशिरस येथे भव्य दिव्य गावदेव मिरवणूक रिल स्टार काळी मैना करीना काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. यावेळी कोमल बारामतीकर, सीमा बारामतीकर, ज्योती सातारा, चांदणी हिवरे, राजनंदिनी राशिनकर, पायल कुडाळकर, माधवी हिवरे, काजल बारामतीकर, यावेळी पेपर ब्लास्ट, डीजे साऊंड सिस्टिम व माळशिरसकरांचा सुप्रसिद्ध असणाऱ्या राजा घोड्यावर भव्य दिव्य मिरवणूक असणार आहे.
सदर भव्य दिव्य नवरदेव गावदेव मिरवणूक निमंत्रक श्री. अमोल पांडुरंग बर्गे, आयोजक श्री. सचिन आप्पा शेंडगे, नियोजक श्री. भाऊसाहेब रुपनवर यांनी केलेले आहे. तरी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी भव्य दिव्य गावदेव मिरवणूक कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन करण्यात येत आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.