माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते नातेपुते येथे मामाश्री पतसंस्थेचे उद्घाटन संपन्न होणार

नातेपुते (बारामती झटका)
नातेपुते ता. माळशिरस येथे महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह शंकरराव मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते मामाश्री ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. नातेपुते या पतसंस्थेचा उद्घाटन समारंभ रविवार दि. २१/०१/२०२४ रोजी सायंकाळी ५.१५ वा. दहीगाव रोड, संतोष हार्डवेअर शेजारी, नातेपुते, ता. माळशिरस येथे होणार आहे. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह विजयसिंह मोहिते पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून विधानसभेचे आमदार राम विठ्ठल सातपुते आणि भारतीय जनता पार्टीचे सोलापूर जिल्हा संघटन सरचिटणीस धैर्यशील भैया मोहिते पाटील हे असणार असणार आहे.
या कार्यक्रमावेळी प्रमुख उपस्थितीत विधान परिषदेचे माजी आमदार रामहरी रुपनवर, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, नातेपुतेचे माजी पोलीस पाटील समाजरत्न राजेंद्र (भाऊ) पाटील, अकलूज ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शिवतेसिंह मोहिते पाटील, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, अहिल्यादेवी पतसंस्थेचे चेअरमन रघुनाथ (अण्णा) कवितके, नातेपुते नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. अनिता लांडगे, नातेपुते नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख, नातेपुते नगरपंचायतीचे नगरसेवक ॲड. बी. वाय. राऊत, नातेपुते एज्युकेशन सोसायटीचे माजी चेअरमन डॉ. एम. पी. मोरे, धुळदेव पतसंस्थेचे चेअरमन ॲड. डी. एन. काळे, सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब भांड, प्रतिष्ठित व्यापारी वैभव शेठ दोशी, पुणे येथील उद्योजक शिवाजीराव सूळ ,नातेपुतेचे ए. पी. आय. महारुद्र परजणे, नातेपुते नगरपंचायतीचे मुख्याधिकारी माधव खांडेकर आदी मान्यवरांसहित सर्व नगरसेवक व नगरसेविका असणार आहे.

मामाश्री ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी मामासाहेब नारायण पांढरे तर व्हाईस चेअरमन पदी रणजीत आगतराव काळे हे आहेत. तसेच संचालक पदी शरद मोरे, ॲड. शिवाजी पिसाळ, ॲड. रावसाहेब पांढरे, डॉ. विठ्ठल कवितके, नितीन गांधी, बिपीन इंगोले, धनाजी राऊत, मोहित जाधव, जब्बार मुलाणी, सौ. कविता पांढरे, सौ. स्वाती बावकर हे आहेत.
या संस्थेचे कामकाज संपूर्ण ऑनलाईन पद्धतीने आहे. त्याचबरोबर मोबाईल बँकिंग ॲप, नेट बँकिंग सुविधा, QR कोड सुविधा, NEFT/RTGS सुविधा, विनम्र व तत्पर सेवा ही या पतसंस्थेचे वैशिष्ट्य आहेत.
तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहण्याचे आवाहन चेअरमन मामासाहेब पांढरे, व्हाईस चेअरमन रणजीत काळे तसेच सर्व संचालक, सभासद, सेक्रेटरी व सेवकवर्ग यांच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



