जागतिक दिव्यांग सहाय्यता दिनानिमित्त तालुक्यातील स्पर्धा परीक्षेमध्ये झालेल्या अधिकाऱ्यांचा भव्य सत्कार समारंभ व स्नेह मेळाव्याचे तरंगफळ येथे आयोजन

तरंगफळ (बारामती झटका
स्वर्गीय रत्नप्रभादेवी मोहिते पाटील दिव्यांग बहुउद्देशीय संस्था आणि ग्रामपंचायत तरंगफळ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक दिव्यांग सहाय्यता दिनानिमित्त शालेय साहित्य व खाऊ वाटप कार्यक्रम तसेच विविध क्षेत्रातील नावलौकिक मिळवलेल्या मान्यवरांचा, एमपीएससी यूपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षा २०२४ मध्ये क्लासवन पदी निवड झालेल्या माळशिरस तालुक्यातील अधिकारी यांचा भव्य सत्कार समारंभ व स्नेह मेळाव्याचे आयोजन बुधवार दिनांक ३/१२/२०२५ रोजी सकाळी ९. ०० वा. श्री सिद्धनाथ मंदिर, तरंगफळ येथे करण्यात आले आहे. यामध्ये सोमनाथ तुकाराम कर्णवर एपीआय ठाणे शहर, प्रदीप दुर्योधन गोरड डीवायएसपी, कल्याणी नानासाहेब शिंदे कमर्शियल पायलट, सागर केशव रणनवरे राजपात्रिक अधिकारी, दिपाली शिवाजी खरात सहाय्यक राज्यकर आयुक्त, सायली शिवाजी पराडे क्लासवन अधिकारी, अजय भागवत तरंगे अभियांत्रिक सहाय्यक, काजल विलास भोसले राजपात्रिक अधिकारी, रोशनी अशोक काळे महसूल सहाय्यक पिंपरी चिंचवड, अहिल्या प्रेमानंद नरुटे महसूल सहाय्यक गडचिरोली, नानासाहेब रणदिवे अन्नपुरवठा अधीक्षक मंत्रालय मुंबई यांचा भव्य सत्कार समारंभ करण्यात येणार आहे.

तरी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन तरंगफळ ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. पद्मिनी नारायण तरंगे आणि स्वर्गीय रत्नप्रभादेवी मोहिते पाटील दिव्यांग बहुउद्देशीय संस्था तरंगफळचे अध्यक्ष गोरख मारुती जानकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करा



