जळभावी येथे संत बाळूमामा व गुरु मुळे महाराज मूर्ती स्थापना तसेच विठ्ठल रुक्मिणी मंदिर व हनुमान मंदिर कलशारोहण सोहळा होणार…

ह. भ. प. नामदेव महाराज सूर्यवंशी व ह. भ. प. चैतन्य महाराज वाडेकर यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन
जळभावी (बारामती झटका)
जळभावी, ता. माळशिरस येथे गुरुवार दि. १०/०४/२०२५ रोजी सकाळी १० वा. ५१ मि. संत बाळूमामा व गुरु मुळे महाराज मूर्ती स्थापना व दुपारी २ वा. ११ मि. विठ्ठल रुक्मिणी मंदिर व हनुमान मंदिर कलशारोहण सोहळा संपन्न होणार आहे.
बुधवार दि. ०९/०४/२०२५ रोजी सायंकाळी ५ ते ७ मूर्ती व कळस मिरवणूक तसेच सायंकाळी ८ ते १० वा. कीर्तनकार ह. भ. प. नामदेव महाराज सूर्यवंशी यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन मारुती मंदिर जळभावी, ता. माळशिरस येथे करण्यात आले आहे.

गुरुवार दि. १०/०४/२०२५ रोजी विठ्ठल रुक्मिणी मंदिर व हनुमान मंदिर कलशारोहण स्वामी सौमानंदजी आर्ट ऑफ लिविंग माळशिरस यांच्या शुभहस्ते कलशारोहण सोहळा होणार आहे. तसेच सायंकाळी ८ ते १० वा. कीर्तनकार ह. भ. प. चैतन्य महाराज वाडेकर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज साक्षात्कार भूमी भामचंद्र डोंगर, भांबोली, ता. खेड, जि. पुणे यांच्या सुश्राव्य कीर्तनाच्या आयोजन करण्यात आले आहे.
तरी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी व भाविक भक्तांनी उपस्थित राहून तीर्थप्रसाद व कीर्तनाचा लाभ घेण्याचे आवाहन समस्त ग्रामस्थ जळभावी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.