कुटुंब… शेवटी कुटुंबच असतं! – पृथ्वीराज सावंत..

वाकाव (बारामती झटका)
सावंत परिवारासाठी आजचा दिवस अत्यंत आनंददायी आणि भावनिक आहे. आदरणीय काका, राज्याचे माजी आरोग्य मंत्री व आमदार प्रा. तानाजीराव सावंत साहेब आणि आमचे वडील, राज्याचे ज्येष्ठ नेते प्रा. शिवाजीराव सावंत सर यांच्यातील गैरसमज दूर झाले असून, आमचं कुटुंब पुन्हा एकदा एकाच भक्कम चौकटीत एकत्र आलं आहे.
गेले काही दिवस सावंत कुटुंबात दुरावा निर्माण झाला होता. परंतु, कुटुंबाची नाळ आणि रक्ताची नाती कोणत्याही राजकीय वावटळीपेक्षा खूप मोठी असतात. आज काकांनी माझ्या आणि माझा भाऊ ऋतुराज याच्या खांद्यावर प्रेमाचा आणि आशीर्वादाचा जो हात ठेवला, तो आम्हा दोघांसाठी एका मोठ्या जबाबदारीचा आणि कृतज्ञतेचा क्षण होता.

हे कुटुंब केवळ एक नाव नाही, तर शिक्षण आणि सहकार क्षेत्रात उभा केलेला मोठा डोलारा आहे. कुटुंबात दुरावा निर्माण करून स्वतःचा राजकीय स्वार्थ साधू पाहणाऱ्यांना आज सडेतोड उत्तर मिळाले आहे. तात्पुरत्या वादळांनी सावंत कुटुंब कधीही डगमगणार नाही. आम्ही एकत्र होतो, एकत्र आहोत आणि सदैव एकत्रच राहू!
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



