सदाशिवनगर रत्नत्रय पतसंस्थेचे सचिव ज्ञानेश उर्फ ज्ञानेश्वर राऊत यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल….

माळशिरस पोलीस स्टेशन येथे तब्बल सात खाजगी सावकार यांच्यावर विविध कलम अन्वये गुन्हा दाखल….
संस्थेचे सचिव, चेअरमन व संचालक मंडळ यांच्या विरोधात संगनमताने बनावट सह्या व खोटी कागदपत्रे बनवून लाखो रुपयाचे कर्ज उचलून आर्थिक फसवणूक केली असल्याची फिर्याद दीपक रामचंद्र गोरे यांची आहे…
सदाशिवनगर (बारामती झटका)
सदाशिवनगर रत्नत्रय पतसंस्थेचे सचिव ज्ञानेश उर्फ ज्ञानेश्वर पांडुरंग राऊत यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल…
माळशिरस पोलिसात तब्बल सात खाजगी सावकार यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे..
संस्थेच्या चेअरमन आणि सचिव ज्ञानेश्वर पांडुरंग राऊत यांनी कर्जदारांना वसुलदारा मार्फत धमकावने, बेमाफ रकमेची वसुली केली आहे.
याबातची सविस्तर माहिती माळशिरस पोलिसांकडून देण्यात आली असून खाजगी सावकार सोहम शामराव भगत, सागर जयराम उरवणे, प्रितम शशिकांत दोशी, रामदास बबन गोफणे, कविता राहुल भगत, सुभाष विठ्ठल सुज्ञे, ज्ञानेश्वर पांडुरंग राऊत यांच्या विरोधात अवैध सावकारी करणे, ज्यादा वसुलीसाठी धमकावणे, आणि जागा हडप करणे, तसेच रत्नत्रय ग्रामीण बिगर शेती सहकारी पथसंस्था सदाशिवनगर चे सचिव ज्ञानेश्वर पांडुरंग राऊत संस्थेचे चेअरमन आणि सर्व संचालक मंडळ यांच्या विरुद्ध संगनमताने बनावट सह्या व खोटी कागदपत्रे बनवून परस्पर लाखो रुपयांचे कर्ज उचलून आर्थिक फसवणूक केली असल्याची फिर्याद दिपक रामचंद्र गोरे रा. सदाशिवनगर यांनी दिली आहे.

भारतीय दंड संहिता 1860 कलम 420, 417, 406,465,468,471,506,34,39,41,45 कलमा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा तपास माळशिरस पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलिस उप विभागीय अधिकारी विशाल नवले करीत आहेत.
रत्नत्रय पतसंस्थेचे सचिव ज्ञानेश उर्फ ज्ञानेश्वर राऊत पोलीसांच्या ताब्यात असल्याची माहिती समोर येत आहे सविस्तर बातमी पुढच्या भागात….
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



