जलजीवन मिशनची कामे वेळेत न करणाऱ्या उपअभियंत्याला निलंबित
सोलापूर (बारामती झटका)
जलजीवन मिशन अंतर्गत कामाचे कार्यारंभ आदेश काढणे, जलजीवन मिशन योजनेअंतर्गत कामांचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण न करणे, वरिष्ठांनी वेळोवेळी आयोजित केलेला बैठकांना उपस्थित न राहणे या अनियमिततेप्रकरणी सांगोला येथील ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता सुरेश कमळे यांना निलंबित करण्यात आले आहे. त्या संदर्भातील आदेश सदस्य सचिव अभिषेक कृष्णा यांच्या सहीने निघाला आहे.
दरम्यान, उपअभियंता कमळे यांच्या अनियमितते प्रकरणी १४ मे २०२४ रोजी विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली होती. याशिवाय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तात्काळ निलंबित करण्याची शिफारस २ जुलै २०२४ रोजी केली होती. त्यानुसार १८ जुलै २०२४ पासून उपअभियंता कमळे यांना निलंबित करण्याचा आदेश पारित करण्यात आला.
कमळेंचे मुख्यालय छत्रपती संभाजीनगर
निलंबित करण्यात आलेले उपअभियंता सुरेश कमळे यांचा आदेश अमलात असेल तेवढ्या कालावधीत त्यांचे मुख्यालय महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, प्रादेशिक विभाग, छत्रपती संभाजीनगर येथे ठेवण्यात येत आहे. त्यांना पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नसल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
helloI really like your writing so a lot share we keep up a correspondence extra approximately your post on AOL I need an expert in this house to unravel my problem May be that is you Taking a look ahead to see you