एस. एम. पी. इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी चि. श्रेयश शेंडगे याचा सन्मान उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर व शितलदेवी मोहिते पाटील यांनी केला….

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मार्गदर्शक डॉ. सचिन शेंडगे यांचे सुपुत्र चिरंजीव श्रेयस शेंडगे यांनी नीट परीक्षेत यश मिळविल्याबद्दल व रशिया येथे एमबीबीएस साठी प्रवेश मिळवला….
माळशिरस (बारामती झटका)
एस. एम. पी. इंग्लिश स्कूल, अकलूज येथील विद्यार्थी चिरंजीव श्रेयश सचिन शेंडगे याने नीट परीक्षेत यश मिळवल्याबद्दल व रशिया येथे एमबीबीएस करता प्रवेश मिळवल्याबद्दल संस्थेच्या सभापती शितलदेवी धैर्यशील मोहिते पाटील व अकलूज उपविभागीय पोलीस उपअधीक्षक नारायण शिरगावकर यांनी श्रेयश शेंडगे याच्या उज्वल यशाबद्दल त्याच्या आई-वडिलांच्या उपस्थितीत सन्मान केला. यावेळी संस्थेचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षिका, मान्यवर, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.
विझोरी गावचे सर्वसामान्य व शेतकरी असणारे सुदाम शेंडगे यांनी आपला मुलगा सचिन यांना डॉक्टर केलेले आहे. डॉ. सचिन शेंडगे यांनी सर्वसामान्य व गोरगरीब रुग्णांना कमी व वाजवी किमतीमध्ये औषध उपचार करून समाजामध्ये गोरगरिबांचे आधारवड बनलेले आहेत. माणसातील देव माणूस असे त्यांना संबोधले जाते. डॉ. सचिन शेंडगे यांनी गोरगरिबांची खऱ्या अर्थाने सेवा केली. त्याचेच त्यांना फळ मिळालेले आहे.

खऱ्या अर्थाने बळीराजा सुखी व्हावा, अडीअडचणी दूर व्हाव्यात, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शेतकऱ्यांचे खासदार राजू शेट्टी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष आंदोलनवीर अजितभैया बोरकर यांच्या खांद्याला खांदा लावून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिलेदार म्हणून ते काम करीत आहेत. सध्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मार्गदर्शक आहेत. गोरगरीब रुग्ण व शेतकऱ्यांची सेवा केलेली असल्याने त्यांच्या मुलाने नीट परीक्षेत घवघवीत यश संपादन करून रशियामध्ये एमबीबीएस करता प्रवेश मिळविलेला आहे. चिरंजीव श्रेयस शेंडगे यांच्या यशाबद्दल विझोरी व पंचक्रोशीमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.