15 ऑगस्टला अकलूजमध्ये भव्य तिरंगा बाईक रॅली! आ. सचिनदादा कल्याणशेट्टी, जिल्हाध्यक्ष गणेश चिवटे यांच्या उपस्थितीत “हर घर तिरंगा 2026” अभियान

लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा माळशिरस तालुक्याच्या वतीने 15 ऑगस्टला अकलूजमध्ये होणार तिरंगा बाईक रॅली.
अकलूज (बारामती झटका)
स्वातंत्र्याचा 79 वा वर्धापन दिन देशभक्तीच्या जोशात साजरा करण्यासाठी भारतीय जनता पार्टी माळशिरस तालुक्याच्या वतीने “हर घर तिरंगा 2026” अभियानांतर्गत भव्य तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही बाईक रॅली शनिवार दि. 15 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 4 वाजता विजय चौक, अकलूज येथून निघणार आहे. या रॅलीला अक्कलकोट विधानसभेचे आमदार मा. श्री. सचिनदादा कल्याणशेट्टी प्रमुख उपस्थिती म्हणून लाभणार आहेत. तर भाजपा सोलापूर जिल्हा अध्यक्ष श्री. गणेश चिवटे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.
“राष्ट्रभक्ति ले हृदय में, हो खड़ा यदि देश सारा। संकटों पर मात कर, यह राष्ट्र विजयी हो हमारा।” हा प्रेरणादायी संदेश देण्यात आला आहे.

केंद्र शासनाच्या “हर घर तिरंगा” अभियानांतर्गत प्रत्येक घरावर तिरंगा फडकवणे आणि नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करणे हा या रॅलीचा मुख्य उद्देश आहे. बाईक रॅलीद्वारे माळशिरस तालुक्यातील युवक, कार्यकर्ते आणि नागरिकांना एकत्र आणून स्वातंत्र्यदिनाचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे.
भारतीय जनता पार्टीचे प्रदेश चिटणीस तथा माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार मा. आमदार राम सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी, माळशिरस तालुका यांच्यावतीने आयोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील सर्व भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी आणि देशभक्त नागरिकांना या रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
15 ऑगस्ट हा केवळ सुट्टीचा दिवस नसून, देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वाहण्याचा दिवस आहे. तिरंगा बाईक रॅलीच्या माध्यमातून माळशिरस तालुका देशभक्तीचा संदेश देणार आहे. “एक तिरंगा, एक देश” या भावनेने सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक भारतीय जनता पार्टी माळशिरस तालुका यांनी केले आहे.
सदरच्या रॅलीचा प्रवास
विजय चौक » गांधी चौक » सदूभाऊ चौक » महर्षी चौक » प्रतापसिंह चौक »आंबेडकर चौक » अण्णाभाऊ साठे चौक » जुने पोलीस स्टेशन » शिवापुर पेठ » मारुती मंदिर » नगरपरिषद » शिवसृष्टी » विजय चौक
असा असणार आहे…

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



