महालक्ष्मी गुरुकुल स्कूलचा स्पर्धा परीक्षेत दमदार ठसा

कुसमोड (बारामती झटका)
महालक्ष्मी गुरुकुल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. संस्थेच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षांमध्ये गुणवत्तेची चमक दाखवत शाळेच्या यशाची परंपरा कायम ठेवली आहे.
राष्ट्रीय स्तरावरील एनएमएमएस इयत्ता ८ वी स्पर्धा परीक्षेत महारत्न प्रशांत मदने पाटील याने जिल्हा गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक मिळवून ₹४८,००० शिष्यवृत्तीसाठी गुणवत्ताधारक होण्याचा मान मिळविला.

तसेच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता सातवी व चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत कु. आदिती प्रशांत मदने पाटील हिने २०८ गुण, तर कु. श्रावणी विठ्ठल सुळ हिने २१० गुण मिळवून पात्रता संपादन केली.
प्रसन्न ऑलिंपियाड नवोदय स्पर्धा परीक्षेत चि. संस्कार सचिन सुळ याने जिल्हा गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक मिळवून संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला.
गेली १२ वर्षे स्पर्धा परीक्षांमधील यशाचा आलेख सातत्याने उंचावत असून गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे संस्थापक प्रा. प्रशांत मदने पाटील, पोलीस पाटील, साळमुख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

या यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत, जिद्द व सातत्यपूर्ण सराव तसेच शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन मोलाचे ठरले असल्याचे त्यांनी नमूद केले. संस्थेच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विद्यार्थी, पालक व शिक्षकांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



