यशवंत सेनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी प्रकाश हनुमंत वाघमोडे यांची नियुक्ती

माळशिरस (बारामती झटका)
यशवंत सेना, महाराष्ट्र राज्यच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी प्रकाश हनुमंत वाघमोडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे अधिकृत नियुक्तीपत्र ८ ऑगस्ट २०२६ रोजी प्रदान करण्यात आले.
यशवंत सेना महाराष्ट्र राज्यचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा मा. राज्यमंत्री बाळासाहेब दोडतले यांच्या नेतृत्वाखाली तसेच राष्ट्रीय उपाध्यक्ष आण्णासाहेब रुपनवर आणि राष्ट्रीय महासचिव नितीनदादा धायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश वाघमोडे यांच्यावर सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करणे, पक्षाचे ध्येय-धोरण व विचारधारा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविणे तसेच सोपविण्यात आलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा विश्वास नियुक्तीपत्रातून व्यक्त करण्यात आला आहे.
प्रकाश वाघमोडे यांच्या नियुक्तीबद्दल माळशिरससह सोलापूर जिल्ह्यातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली यशवंत सेनेची जिल्ह्यात संघटनात्मक ताकद वाढण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

यावेळी सुहास सिद, संजय मसके, शितल गुजरे, उमेश शिंदे, भैयासाहेब शिंदे, केतन सागर, अजय काळे, संग्राम टेळे, तुषार भिताडे, विनायक रेडे, यश देशमुख, प्रशांत शिद, चैतन्य देशमुख, ओंकार वाघमोडे, किशोर विरकर, रोहित वाघमोडे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रकाश हनुमंत वाघमोडे यांना पुढील संघटनात्मक व सामाजिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



