आमदार मातोश्री स्व. सौ. जिजाबाई विठ्ठल सातपुते यांच्या तृतीय पुण्यस्मरण निमित्त शालेय दप्तर वाटप…

स्वर्गीय सौ जिजाबाई विठ्ठल सातपुते यांच्या तृतीय पुण्यस्मरण निमित्त हरिभाऊ पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली सुभाष सुज्ञे उर्फ हरी ओम यांचा आदर्शवत स्तुत्य उपक्रम….
सदाशिवनगर (बारामती झटका)
भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस तथा माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या मातोश्री स्वर्गीय सौ. जिजाबाई विठ्ठल सातपुते यांच्या तृतीय पुण्यस्मरण निमित्त गुरुवार दि. 13/08/2026 रोजी सकाळी दहा वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सदाशिवनगर येथील विद्यार्थ्यांना शालेय दप्तर वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन आमदार यांचे विश्वासू सहकारी हरिभाऊ पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली सुभाष सुज्ञे उर्फ हरी ओम यांचा आदर्शवत स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे..

बीड जिल्ह्यातील डोईठाण गावामधील श्री विठ्ठल सातपुते यांनी माळशिरस तालुक्यातील साखर कारखान्यामध्ये ऊसतोड करून आपल्या परिवारांना स्वाभिमानाने जीवन जगवून आपल्या मुलांवर चांगले संस्कार केलेले आहेत. मातोश्री जिजाबाई यांचाही आपल्या शेतामध्ये काबाडकष्ट करून मुलांना उच्च शिक्षित घडविण्यामध्ये सिंहाचा वाटा आहे. लहानपणीच हिऱ्याला जसे पैलू पाडतात तशाच पद्धतीने राम यांना घडविलेले आहे. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात या म्हणीप्रमाणे मातोश्री जिजाबाई यांनी गावातीलच संघाच्या शाखेमध्ये ज्ञान आत्मसात करण्याकरता वळण लावलेले होते. गरीब परिस्थिती मात्र डोळ्यांमध्ये ध्येय आणि उद्दिष्ट घेऊन राम यांनी पुण्यामध्ये उच्च शिक्षण पूर्ण केले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चळवळीमध्ये सहभागी होऊन अन्याय होईल त्या ठिकाणी पेटून उठत असत. सर्व विद्यार्थ्यांमध्ये आक्रमक भूमिकेमुळे विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय ठरलेले होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, विधान परिषद आमदार श्रीकांतजी भारतीय यांच्यासह अनेकांच्या सहकार्याने विधिमंडळाच्या सभागृहांमध्ये माळशिरस तालुक्याच्या जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली. मिळालेल्या संधीचे सोने करून आमदार काय करू शकतो, याचा प्रत्यय तालुक्यातील जनतेला दिलेला आहे. जनता दरबाराची संकल्पना माळशिरस तालुक्यात पहिल्यांदा राबवून जनतेचे लोकप्रिय, दमदार, आमदार कामाचा माणूस अशी ओळख निर्माण केली. पीडित, गोरगरीब व सर्वसामान्य जनतेच्या सर्व अवयवाची मोफत ऑपरेशन करून गोरगरिबांचे आरोग्यदूत ठरले. आपण केलेल्या संस्कारावर आपला राम जनतेची सेवा करतोय, याचा अभिमान जिजाबाई व विठ्ठल सातपुते यांना मनस्वी वाटत होता.
जिजाऊ मासाहेब यांनी राष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज दिले, त्याच पद्धतीने मातोश्री जिजाबाई यांनी राम यांना जन्म देऊन माळशिरस तालुक्यातील प्रलंबित विकासाचा वनवास संपवण्याचे काम सुरू आहे.

जिजाबाई यांनी राम यांना जन्म देताना सर्वसाधारण व सामान्य महिला होत्या. मात्र मृत्यूच्या वेळी आमदाराच्या मातोश्री होत्या. अशा मातोश्री जिजाबाई यांचा तृतीय पुण्यस्मरण येत आहे. योगायोगाने त्यांच्या जन्माला 75 वर्ष पूर्ण होत आहेत, असा दुग्ध शर्करा योगनिमित्त हरिभाऊ पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली सुभाष सुज्ञे उर्फ हरी ओम यांनी आदर्शवत स्तुत्य उपक्रमाचे आयोजन केलेले आहे. चांगली संकल्पना असल्याने यासाठी मित्रपरिवार यांनी सहकार्य केलेले आहे. तसं पाहिलं तर हरी ओम यांचा उद्देश अतिशय चांगला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेमध्ये येत असतात. अशा विद्यार्थ्यांना फुल नाही फुलाची पाकळी म्हणून शालेय दप्तर वाटपाचा उपक्रम हाती घेतलेला आहे. या स्तुत्य उपक्रमाचे समाजातील नेते व कार्यकर्ते यांनी आदर्श घ्यावा, अशा पद्धतीने आदर्शवत स्तुत्य उपक्रमाचे आयोजन केलेले आहे…

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



