राजमुद्रा प्रतिष्ठान लवंगतर्फे गोविंद वृद्धाश्रमातील ६० जणांना भोजन; केसर आंब्याचे वृक्षारोपण..

लवंग (बारामती झटका)
सामाजिक बांधिलकी जपत राजमुद्रा प्रतिष्ठान, लवंग यांच्या वतीने गुरुवार, दि. २४ सप्टेंबर २०२६ रोजी टेंभुर्णी येथील गोविंद वृद्धाश्रम येथे स्तुत्य सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत आश्रमातील सुमारे ६० जणांसाठी भोजनाची व्यवस्था प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली.
केवळ भोजनदानापुरता हा उपक्रम मर्यादित न ठेवता, पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत यानिमित्ताने आश्रम परिसरात केसर आंब्याच्या रोपाचे वृक्षारोपण करण्यात आले. अन्नदानासोबतच वृक्षारोपणाचा उपक्रम राबवून सामाजिक सेवा आणि पर्यावरण संवर्धन यांची सांगड घालण्याचा सकारात्मक प्रयत्न राजमुद्रा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी केला.
यावेळी गोविंद वृद्धाश्रम, टेंभुर्णीचे संचालक दशरथ महाराज देशमुख यांनी राजमुद्रा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचे स्वागत करून त्यांच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. समाजातील गरजू घटकांसाठी अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबविणे ही काळाची गरज असून, तरुणांनी सामाजिक कार्यात पुढाकार घेणे ही समाधानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आश्रमाला भेट देऊन भोजनाची व्यवस्था केल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.

राजमुद्रा प्रतिष्ठान लवंगच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी, अन्नदान, पर्यावरण शसंवर्धन आणि समाजोपयोगी उपक्रमांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला जात आहे. ‘सेवा हीच सामाजिक बांधिलकी’ या भावनेतून राबविण्यात आलेल्या या शउपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.

या उपक्रमातून अन्नदानासोबतच वृक्षारोपणाचे महत्त्व अधोरेखित झाले असून, समाजातील इतर संस्था, मंडळे आणि तरुणांनीही अशा विधायक उपक्रमांचे अनुकरण करावे, असा सकारात्मक संदेश या निमित्ताने देण्यात आला. – विनोद भोसले, कृषीमित्र

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



