मळोली गावातील प्रगतशील बागायतदार पांडुरंग ब्रह्मदेव पवार यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन….

रत्नाई इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक अध्यक्ष ॲड. राजेंद्र पांडुरंग पवार यांना पितृषोक…
मळोली (बारामती झटका)
मळोली, ता, माळशिरस गावातील प्रगतशील बागायतदार श्री, पांडुरंग ब्रह्मदेव पवार यांचे शुक्रवार दि, 14/08/2026 रोजी अल्पशा आजाराने वयाच्या ७४ व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रत्नाई इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पांडुरंग पवार व किरण पांडुरंग पवार यांचे ते वडील होते..
स्वर्गीय पांडुरंग पवार यांना बापू या नावाने ओळखत होते. त्यांचा स्वभाव मनमिळावू होता. शेती व्यवसायातून त्यांनी आपल्या प्रपंचाची प्रगती करून मुलांना चांगले संस्कार दिलेले आहेत. त्यांच्यावर आजच दुपारी तीन वाजता वैकुंठ स्मशानभूमी मळोली येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.

बापूंच्या दुःखद निधनाने पवार परिवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. पवार परिवार यांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो आणि बापूंच्या आत्म्याला शांती लाभो, हीच बारामती झटका परिवार यांचे कडून भावपूर्ण आदरांजली आहे..
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



