जिल्हा परिषद कर्मचारी संस्थेचे कार्य उल्लेखनीय – मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे
माळशिरस (बारामती झटका)
जिल्हा परिषद सोलापूरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे मॅडम शासकीय कामानिमित्त माळशिरस तालुक्याच्या दौऱ्यावर आल्या होत्या. त्यादरम्यान त्यांनी माळशिरस तालुका जिल्हा परिषद सेवकांची पतसंस्था मर्यादित माळशिरस या संस्थेस भेट दिली. भेटीदरम्यान संस्थेचा आढावा घेतला असता या पतसंस्थेचे कार्य उल्लेखनीय असून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
भेटीदरम्यान संस्थेच्या वतीने संस्थेचे संस्थापक उत्तमराव माने, चेअरमन रवींद्र पवार, व्हा. चेअरमन डॉ. विकास तांबडे, ज्येष्ठ संचालक अशोकराव रणनवरे, संचालक एम. आर. बुगड, आर. डी. राऊत यांच्या हस्ते मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मनीषा आव्हाळे मॅडम यांचा पुस्तके व पुष्प गुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
भेटीदरम्यान संस्थेच्या कार्याचा आढावा संस्थेचे संस्थापक मार्गदर्शक उत्तमराव माने यांनी सांगून त्यात संस्थेने केलेल्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या कार्याचा आढावा सांगितला. संस्थेचा आर्थिक लेखाजोखा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासमोर सादर केला असता मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मनीषा आव्हाळे मॅडम यांनी माळशिरस तालुका जिल्हा परिषद सेवक पतसंस्थेचे कार्य कौतुकास्पद असून इथून पुढच्या काळात संस्थेची अशीच भरभराट होवो, अशा शुभेच्छा दिल्या.
सदर भेटीवेळी पंचायत समिती माळशिरसचे गटविकास अधिकारी विनायकाजी गुळवे साहेब, सहाय्यक गटविकास अधिकारी मोरे साहेब, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. रामचंद्र मोहिते, कक्ष अधिकारी महेंद्र बुगड, जिल्हा परिषद बांधकामचे उपाभियंता आर. एस. रणनवरे, पाणीपुरवठा उपविभाग माळशिरसचे उप अभियंता के. एस. बाबर तसेच संस्थेचे संचालक मंडळ, सभासद, पंचायत समिती माळशिरचे सर्वच विभागाचे विभाग प्रमुख, सभासद उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सचिव राजेंद्र मिसाळ यांनी करून संस्थेचे चेअरमन रवींद्र पवार यांनी आभार मानले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
This was such an interesting read! I chuckled a few times. For more laughs and insights, visit: DISCOVER HERE. Anyone else have thoughts on this?