सुळेवाडी येथे वास्तुशांती व इतर कार्यक्रमांचे आयोजन

श्री. हनुमंत सुळे व श्री. दादा सुळे यांच्यावतीने कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन
सुळेवाडी (बारामती झटका)
आपल्या प्रत्येकाचं आपलं एक घर असावं असं स्वप्न असतं. आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. माळशिरस तालुक्यातील सुळेवाडी येथील सुळे परिवाराने हे स्वप्न सत्यात उतरवत ‘विठ्ठल पॅलेस’ ही वास्तू उभा केली आहे. सुळे परिवाराने बांधलेल्या ‘विठ्ठल पॅलेस’ या नूतन वास्तूची वास्तुशांती व सत्यनारायण पूजेचे आयोजन सोमवार दि. १८ डिसेंबर २०१३ रोजी ‘विठ्ठल पॅलेस’ बापू सुळे वस्ती, सातारा-पंढरपूर रोड, सुळेवाडी येथे करण्यात आले आहे. या दिवशी पहाटे सकाळी ५ ते ७ वा. वास्तुशांती व गृहप्रवेश करण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी १२ ते २ वा. सत्यनारायण पूजा करण्यात येणार आहे. तर दुपारी २ वाजता पारंपारिक गजी ढोल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर सत्कारमूर्ती गुरुवर्य नारायण करांडे गुरुजी यांचे गुरुपूजन व सत्कार समारंभ होणार आहे. कीर्तनकार गुरुभक्ती भूषण श्री. हरीनंदन महाराज यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन रात्री ८ वाजता करण्यात आली आहे. सर्व कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन श्री. हनुमंत देनबा सुळे व श्री. दादा देनबा सुळे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

तरी सर्व आप्तेष्ट नातेवाईक आणि मित्रपरिवार आणि ग्रामस्थ यांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून आमच्या आनंदात सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. देनबा बयाजी सुळे व सौ. इंदुबाई देनबा सुळे, श्री. सुरेश तुकाराम सुळे व सौ. सुलोचना सुरेश सुळे, श्री. रमेश तुकाराम सुळे व सौ. अलका रमेश सुळे, श्री सुनील तुकाराम सुळे व सौ. सिंधुबाई सुनील सुळे, श्री. रवींद्र तुकाराम सुळे व सौ. बबन रवींद्र सुळे, श्री. हनुमंत देनबा सुळे व सौ. मनीषा हनुमंत सुळे, श्री. दादा देनबा सुळे व सौ. संध्या दादा सुळे व समस्त सुळे परीवार यांच्यावतीने करण्यात आले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.