जीवनदायी पालेभाजी – करडई
माळशिरस (बारामती झटका)
ही वर्षायू वनस्पती अॅस्टरेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव कॅरथॅमस टिंक्टोरियस असे आहे. या वनस्पतीचे मूलस्थान अॅबिसिनियाचा डोंगराळ प्रदेश व अफगाणिस्तान असावे, असे काही तज्ज्ञांचे मत आहे. फुलांपासून मिळणार्या लाल रंगाकरिता बहुतेक पौर्वात्य व पाश्चिमात्य देशांत या वनस्पतीची लागवड करतात. भारतात जवळजवळ सर्व राज्यांत करडईची लागवड बियांतील तेलाकरिता केली जाते. या बियांपासून प्रामुख्याने खाद्यतेल मिळवितात. फुलो-यासह करडई वनस्पती करडईचे झुडूप ३०-६० सेंमी. उंच वाढते. पाने साधी, एकाआड एक, लांबट व बिनदेठाची असून कडांवर मऊ काटे असतात. फुलोरा स्तबक प्रकारचा असतो. तो पिवळा, नारिंगी वा लाल असून तो फांद्यांच्या टोकाशी येतो. एका फुलोर्यात १५-२० फुले असतात. फळे मऊ, लांबट व चौधारी असतात. प्रत्येक फळात एकच बी असते.
करडईची पाने चवीला कडवट असून ती पाचक आहेत. कोवळ्या पानांची भाजी करतात. पानांमध्ये ‘अ’ जीवनसत्त्व, फॉस्फरस व कॅल्शियम असते. फुले कडू, शामक व काविळीवर गुणकारी असतात. करडईचे तेल सौम्य रेचक असून ते सांधेदुखी, खरूज व व्रणांवर लावतात. प्राचीन काळी करडईची लागवड तिच्या बियांमधील कॅरथॅमीन हा रंजक पदार्थ मिळविण्यासाठी केली जात असे. त्याचा वापर खाद्यपदार्थांना रंग व चव येण्यासाठी करीत असत. प्राचीन ईजिप्शियन राजघराण्यातील ममीवरच्या कपड्यांना हाच रंग दिलेला आहे, हे रासायनिक चाचणीत सिद्ध झाले आहे. हल्ली करडईची लागवड प्रामुख्याने तेलासाठी केली जाते.
करडई पालेभाजी खूप उष्ण आहे. चरबी वाढू नये म्हणून याच्या तेलाचा उपयोग होतो. तसेच याची पालेभाजी वजन वाढू देत नाही. कफ प्रकृतीच्या लठ्ठ व्यक्तींना करडईची भाजी फार उपयुक्त आहे. या पालेभाज्यांच्या रसाने एक वेळ लघवी साफ होते. मात्र डोळय़ाच्या व त्वचेच्या विकारात करडई वापरू नये. करडईच्या बियांच्या तेलाची प्रसिद्धी सफोला या ब्रॅण्डनावामुळे झाली आहे. त्यात तुलनेने उष्मांक कमी असतात.
करडईच्या बियांपासून चवहीन व रंगहीन, परंतु भरपूर पोषकद्रव्ये असलेले तेल मिळते. या तेलात वेगवेगळी मेदाम्ले असतात. करडईच्या तेलात ओलेइक आम्ल व लिनोलिइक आम्ल असतात. ही आम्ले रक्तातील कोलेस्टेरॉलवर नियंत्रण ठेवण्याचे काम करतात. सूर्यफूल, सोयाबीन व ऑलिव्ह यांच्या तेलाबरोबरच करडईच्या तेलापासूनही मार्गारीन (एक प्रकारचे लोणी) तयार करतात.
संकलन संकल्पना
अनिल देशपांडे बार्शी
९४२३३३२२३३
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Hello there! Do you know if they make any plugins to help with
SEO? I’m trying to get my blog to rank for some targeted keywords but I’m not seeing very good results.
If you know of any please share. Appreciate it! You can read similar
blog here: Eco wool