क्रीडाताज्या बातम्या

“काय सांगताय” माळशिरस येथे बैलगाडी मालकांनी येताना बैलगाडी समवेत यायचं तर, बक्षीस जिंकून मोटरसायकलवर जायचं….

श्री गणेश उत्सवानिमित्त श्री. तुकाराम भाऊ देशमुख व श्री. सचिन आप्पा वावरे मित्र मंडळाने ओपन बैलगाडी शर्यतीत मोटरसायकल बक्षीसांची खैरात केलेली आहे.

माळशिरस (बारामती झटका)

माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य माळशिरस शहराचे संयमी नेतृत्व श्री. तुकाराम भाऊ देशमुख व माळशिरस नगरपंचायत बिनविरोध नगरसेवक व युवा उद्योजक सचिन आप्पा वावरे मित्र परिवारांच्यावतीने श्री गणेश उत्सवानिमित्त भव्य जुने हिंदकेसरी देशमुख पट्टा बैलगाडी मैदान ६१ फाटा माळशिरस यांच्या वतीने ओपन बैलगाडी शर्यतीचे आयोजन गारवाड पाटी, म्हसवड रोड, माळशिरस, ता. माळशिरस येथे रविवार दि. ०८/१०/२०२३ सकाळी ८ वाजलेपासून भव्य बैलगाडी शर्यतीचे आयोजन केलेले आहे. श्री गणेश उत्सवानिमित्त श्री. तुकाराम भाऊ देशमुख व सचिन आप्पा वावरे मित्र मंडळाने ओपन बैलगाडी शर्यतीत मोटरसायकल बक्षीसांची खैरात केलेली आहे. माळशिरस येथील बैलगाडी मालकांनी येताना बैलगाडी समवेत यायचे आणि बक्षीस जिंकून मोटरसायकलवर जायचे अशी सुविधा उपलब्ध केलेली आहे.

ओपन बैलगाडी शर्यतीत प्रथम क्रमांक बुलेट व ढाल द्वितीय क्रमांक युनिकॉर्न व ढाल तृतीय क्रमांक 125cc शाईन व ढाल चतुर्थ क्रमांक 100cc शाईन व ढाल पाचवे बक्षीस 100cc शाईन व ढाल सहावी क्रमांक एलईडी टीव्ही व ढाल सातवा क्रमांक एलईडी टीव्ही व ढाल क्वार्टर फायनल साठी प्रथम क्रमांक 41 हजार द्वितीय क्रमांक 31 हजार तृतीय क्रमांक 21हजार चतुर्थ क्रमांक 11हजार पाचवा क्रमांक 07 हजार सहावा क्रमांक 05 हजार सातवा क्रमांक 05 हजार अशी बक्षिसे राहणार आहेत सदरच्या कार्यक्रमाचे समालोचन सुनील मोरे पेडगाव, झेंडा पंच आगतराव( नाना) देशमुख, थर्ड पंच नितीन (आबा) शेवाळे, गाडी नोंदणी दुपारी एक वाजेपर्यंत केली जाईल प्रवेश फी 2000 हजार रुपये राहील. संपर्क हरिभाऊ देशमुख 9545784572, अमोल सर्जे 8530692005, आप्पासो टेळे 9890185901, रामभाऊ देशमुख 9890528794 यांच्याशी संपर्क करावा तर ऑनलाइन प्रवेश फी तात्यासो टेळे 9423989323 या नंबरवर स्वीकारली जाईल.

सदरच्या बैलगाडी शर्यतीचे लाईव्ह प्रक्षेपण एसटीसी युट्युब लाईव्ह व बारामती झटका युट्युब चॅनेल वर लाईव्ह पाहता येणार आहे. तरी सर्व बैलगाडी चालक-मालक शौकीन यांनी ओपन बैलगाडी शर्यतीचा लाभ घ्यावा असे आवाहन, श्री. तुकाराम भाऊ देशमुख व श्री. सचिन आप्पा वावरे मित्र मंडळ यांच्यावतीने नम्र आवाहन करण्यात येत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button