ताज्या बातम्यामनोरंजनशैक्षणिक

कलेच्या प्रांगणातल्या पाखरांना आकाशात विहार करण्यासाठी त्यांच्या पंखात बळ निर्माण करणारे जयसिंह मोहिते पाटील.

संग्रामनगर (बारामती झटका) केदार लोहकरे यांजकडून

शिक्षण प्रसारक मंडळ असो किंवा प्रताप क्रिडा मंडळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वेळोवेळी आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झालेला आहे. आज ही मुले नावारूपाला आली आहेत. त्यांनी आपले नाव मोठे करत गावाचे, तालुक्याचे, जिल्ह्याचे व संस्थेच्या नावात मानाचा तुरा रोवला आहे.

यामध्ये आनंदयात्रा, रयतेचा राजा शिवछत्रपती, गौरव मराठी मातीचा, गौरव भारतीय लोककलेचा, नृत्य व अभिनय प्रशिक्षण यासारख्या अनेक उपक्रमामुळे आज अनेक विद्यार्थी दूरदर्शन मालिका व चित्रपट सृष्टीमध्ये अत्यंत उत्कृष्टपणे कामगिरी करताना दिसत आहेत. यामध्ये राष्ट्रपती पुरस्कार विजेता चित्रपट दिग्दर्शक मकरंद माने, गाजलेल्या सैराट मराठी चित्रपटाची प्रमुख हिराॅईन रिंकू राजगुरू उर्फ आर्ची, छोट्या पडद्यावरील छत्रपती संभाजी महाराज सिरीयलमध्ये बहिर्जी नाईकांची भूमिका अजरामर करणारे अजय तपकिरे, सोमनाथ कांबळे, सेंट्रल युनिव्हर्सिटी, सागर, मध्य प्रदेश येथे नाट्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक म्हणून विद्यार्थ्यांना नृत्य अभिनय व दिग्दर्शनाचे धडे देणारे आपल्या संस्थेचे विद्यार्थी डॉ. अल्ताफ मुलाणी, प्रसिद्ध दिग्दर्शक सहदेव घोलप, सिनेदिग्दर्शक योगिराज भिसे, चित्रपट अभिनेता योगेश खिल्लारे, राष्ट्रीय पारितोषिक प्राप्त दिग्दर्शक प्रा. धीरज गुरव, एनडीटीव्ही दिल्लीमध्ये काम करणारा असिफ मुजावर यासारखे अनेक विद्यार्थी आज चित्रपट व दूरदर्शन मालिकांमधून चमकताना दिसत आहेत. या व्यतिरिक्त अनेक कलावंत आहेत हे केवळ आपण आपल्या संस्थेच्या माध्यमातून जाणीवपूर्वक राबवलेल्या उपक्रमामुळे व आपल्या दूरदृष्टीमुळे त्यांचे उज्वल भवितव्य घडले आहे.

हि सगळी मुले भले ही पैशांनी गरीब असतील पण, त्यांच्यातील कलेची श्रीमंती ओळखून त्या मुलांना संस्थेच्या माध्यमातून त्यांच्या कलेला सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हणून त्यांना कोणताच आधार नसणारी ही सारी लेकरे तुम्ही दिलेल्या योग्य वेळी संधीमुळे आज नावारूपाला आली आहेत. आकाशात मुक्तपणे गवसणी घालत आहेत.

बाळदादांनी आपल्या कलावंतावरील प्रेमाची महती शब्दात सांगेल तेवढे कमीच आहे. पण सोन्याचा कस सोनाराला जास्त कळतो म्हणूनच तो अस्सल बाव्वन्नकशी सोने बरोबर शोधून काढतो, तशीच बाळदादांची नजर आहे. योग्य वेळी पाठीशी उभे राहून व सहकार्य केल्यामुळे ही मुले नावारूपाला आली आहेत. केवळ वल्गना करणारे भरपुर असतात पण, दिलेला शब्द सत्यात उतरवणारे फक्त माळशिरस तालुक्यात जयसिंह मोहिते पाटील आहेत.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ग्रुपमध्ये बारामती झटका न्यूज संपादक श्रीनिवास कदम पाटील 9850104914 हा नंबर समाविष्ट करावा..

Related Articles

14 Comments

  1. Only a smiling visitant here to share the love (:, btw outstanding design and style “Reading well is one of the great pleasures that solitude can afford you” by Harold Bloom

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button