ताज्या बातम्या

श्री. शंकरराव वाघमारे यांची सोलापूर लोकसभा समन्वयक पदी निवड…

सोलापूर (बारामती झटका)

सोलापूर लोकसभा समन्वयक पदी भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा सोलापूर भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष श्री. शंकरराव वाघमारे यांची निवड जाहीर झाली. याबद्दल त्यांचा सत्कार मोहोळ विधानसभा विस्तारक तथा सोलापूर भाजपा जिल्हा चिटणीस बादलसिंह ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला.

भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चा यांनी राज्यातील ४८ लोकसभा क्षेत्रासाठी लोकसभा समन्वयक यांची निवड केली आहे. यामध्ये सोलापूर साठी श्री. शंकरराव वाघमारे यांची निवड घोषित करण्यात आली आहे. श्री. शंकरराव वाघमारे पक्षात गेली ३८ वर्ष निष्ठावंत म्हणून आणि सातत्याने प्रामाणिकपणे काम करत असल्याने त्यांना ही संधी मिळाली आहे. ग्राम पातळीपासून प्रदेश पातळीपर्यंत पक्षाची सर्व छोटी-मोठी आंदोलने आणि ९०,९२ ची अयोध्या कारसेवा, जम्मु काश्मीरमध्ये आंदोलन अशा विविध कार्यक्रम करण्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे.

श्री. शंकरराव वाघमारे यांनी यापूर्वी सोलापूर लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून २०१४ मध्ये काम पाहिलं होते. त्यावेळी खासदार अँड्. शरद बनसोडे यांनी तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा दणदणीत पराभव केला होता. त्याचबरोबर त्यांनी विद्यमान पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पदवीधर मतदारसंघाच्या २००८ व २०१४ च्या निवडणुकीत यशस्वी जबाबदारी पार पाडली होती. अक्कलकोट विधानसभा २००९ च्या निवडणुकीच्या वेळी ही आ. सिद्रामाप्पा पाटील यांचे समन्वयक आणि निवडणूक निरीक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले होते. मोहोळ तालुक्यातील भाजपाचे पहिले पंचायत समितीचे सदस्य म्हणून त्यांनी विजय मिळवला होता. ज्या गावात वडील ग्रामपंचायतीमध्ये शिपाई म्हणून काम करत होते. तिथेच त्यांनी सरपंच पद पण ५ वर्षे पूर्ण वेळ भूषविले होते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ग्रुपमध्ये बारामती झटका न्यूज संपादक श्रीनिवास कदम पाटील 9850104914 हा नंबर समाविष्ट करावा..

Related Articles

7 Comments

  1. It?¦s really a cool and useful piece of information. I?¦m satisfied that you shared this helpful information with us. Please stay us informed like this. Thank you for sharing.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort