ताज्या बातम्यादेश-विदेशशैक्षणिक

डॉक्टर आप्पासाहेब टेळे यांनी माळशिरसच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला

माळशिरस (बारामती झटका)

माळशिरस शहरातील सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. आप्पासाहेब भिवाजी टेळे यांनी सिलेक्शन ऑफ आयडियल इंटर लेन्स या विषयावर पेपर प्रेझेंटेशन केल्यामुळे प्रथम क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन करून माळशिरस तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माळशिरस नगर पंचायतीचे नगराध्यक्ष डॉ. आप्पासाहेब देशमुख, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माळशिरस तालुकाध्यक्ष सुरेश टेळे, मुख्याधिकारी नितीन गाढवे आदी उपस्थित होते. त्यामुळे माळशिरस शहर व तालुक्यातील कानाकोपऱ्यातून डॉ. आप्पासाहेब टेळे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

गोवा येथे ६ वी आंतरराष्ट्रीय व १८ वी राष्ट्रीय परिषद सिनर्जी २०२३ टास द असोसिएशन ऑफ शलाका महाराष्ट्र यांच्यावतीने ही परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेमध्ये डॉ. आप्पा भिवाजी टेळे यांना प्रथम क्रमांकाने सन्मानित करण्यात आले. हा सन्मान गोव्याचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते संपन्न झाला. ही परिषद दि. ६, ७, ८ ऑक्टोबर २०२३ रोजी पार पडली. या परिषदेला देश विदेशातून डॉक्टरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ग्रुपमध्ये बारामती झटका न्यूज संपादक श्रीनिवास कदम पाटील 9850104914 हा नंबर समाविष्ट करावा..

Related Articles

12 Comments

  1. Simply desire to say your article is as astounding. The clarity for your post is just nice and i could suppose you’re knowledgeable on this subject. Fine together with your permission allow me to take hold of your RSS feed to keep up to date with drawing close post. Thank you one million and please continue the enjoyable work.
    reddit mbit casino south africa

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button