ताज्या बातम्याशैक्षणिक

शंकरराव मोहिते महाविद्यालयातील युवा महोत्सवातील कलाकारांचा सन्मान समारंभ संपन्न

संग्रामनगर (बारामती झटका) केदार लोहकरे यांजकडून

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा १९ वा युवा महोत्सव स्वेरीज कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, पंढरपूर या ठिकाणी नुकताच संपन्न झाला. या युवा महोत्सवामध्ये शंकरराव मोहिते महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सर्वसाधारण विजेतेपदाचा मान मिळवला. त्यानिमीत्त शिक्षण प्रसारक मंडळाचे मार्गदर्शक संचालक जयसिंह शंकरराव मोहिते पाटील व संचालिका कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते युवा महोत्सवातील कलाकारांचा व त्यांच्या माता-पिता, मार्गदर्शक शिक्षकांचा सन्मान ट्रॉफी, शाल व श्रीफळ देऊन करण्यात आला. हा सोहळा स्मृती भवन, अकलूज येथे संपन्न झाला.

यावेळी मार्गदर्शन करताना जयसिंह मोहिते पाटील म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना दाद देत विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच आपल्यामध्ये अंगी असणाऱ्या कलागुणांना देखील विकसित करावे. कारण कलाच माणसाला जगायला शिकवते. असे त्यांनी आपल्या मनोगतात सांगून यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

यावेळी युवा महोत्सवातील निवडक कला प्रकारांचे सादरीकरण देखील करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना दाद देण्यासाठी अकलूज पंचक्रोशीतील ग्रामस्थ, कलाकारांचे माता-पिता व महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक नारायण फुले, रामभाऊ गायकवाड, सुभाष दळवी, वसंतराव जाधव, बाळासाहेब सणस, सौ. निशा गिरमे, सचिव अभिजीत रणवरे, सहसचिव हर्षवर्धन खराडे, स्थानिक प्रशालेचे मुख्याध्यापक, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ग्रुपमध्ये बारामती झटका न्यूज संपादक श्रीनिवास कदम पाटील 9850104914 हा नंबर समाविष्ट करावा..

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button