कण्हेर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी अशोक दादासो ठवरे यांची निवड.

माळशिरस पंचायत समितीचे सदस्य माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील नेते गौतमआबा माने पाटील यांचे कट्टर समर्थक यांना संधी मिळाली.
कण्हेर (बारामती झटका)
माळशिरस पंचायत समितीचे सदस्य तालुक्याच्या पश्चिम भागातील नेते गौतमआबा माने पाटील यांचे विश्वासू सहकारी कट्टर समर्थक श्री. अशोक दादासो ठवरे यांना कण्हेर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध होण्याचा बहुमान मिळालेला आहे.
कण्हेर ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत पंचायत समिती सदस्य गौतमआबा माने पाटील व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माळशिरस तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोहिते पाटील समर्थक यांचा निवडणुकीत सुपडासाफ केलेला होता. पहिली शालेय व्यवस्थापन समिती बरखास्त करून नव्याने स्थापन केलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कन्हेर शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी अशोक दादासो ठवरे, उपाध्यक्ष गोरख अर्जुन माने, सदस्य गोरख सुखदेव लोखंडे, बानुबाई विठ्ठल बोडरे, अनिता दुर्योधन धाईंजे, मोहन विलास माने, गणेश तात्यासो काळे, राणी अनिल राऊत, संतोष पोपट माने, सारिका मंगेश मिसाळ, प्रताप सर्जेराव माने, सुवर्णा धनाजी थोरात, शोभा राजू ढगे, उमा अशोक माने, ग्रामपंचायत प्रतिनिधी दादासो सदाशिव माने, शिक्षण तज्ञ संदीप कृष्णराव काळे, शिक्षक प्रतिनिधी पोपट भानुदास भोसले, सचिव राणबा महादेव वाघमारे अशी शालेय व्यवस्थापन समितीची निवड करण्यात आली आहे.


गौतमआबा माने पाटील यांच्या व्यक्तिगत व सार्वजनिक कार्यक्रमात खांद्याला खांदा लावून काम करणारे अशोक ठवरे यांना शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी संधी मिळालेली असल्याने निष्ठावंत व कट्टर समर्थक यांच्या कार्याची दखल घेतली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.