ताज्या बातम्यासामाजिक

“अकलूज हब” समजल्या जाणाऱ्या गावात डॉक्टरांचे दुष्कृत्य, वैद्यकीय पेशाला काळीमा फासणारी घटना घडली आहे.

अकलूज येथील अकलाई आयसीयु हॉस्पिटल येथील चार डॉक्टरांवर अत्याचाराचा गुन्हा दाखल

अकलूज (बारामती झटका)

पैशांच्या देण्या-घेण्यावरून अकलूजमधील वैद्यकिय क्षेत्रात नावाजलेल्या चार डॉक्टरांनी विवाहित महिलेवर अत्याचार केल्याच्या फिर्यादीवरून अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकलूज हब समजल्या जाणाऱ्या गावात डॉक्टरांच्या दुष्कृत्याने वैद्यकीय क्षेत्राला काळीमा फासणारी घटना घडलेली आहे. सदर डॉक्टरांनी माळशिरस न्यायालयात दाखल केलेल्या अटकपूर्व जामिन अर्जावर आज सुनावणी होऊन त्यांना तात्पुरता ९ तारखेपर्यंत जामिन मंजुर करण्यात आला आहे. या घटनेने अकलूज वैद्यकिय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

याबाबत अकलूज पोलीस सुत्रांकडुन मिळालेल्या माहितीनूसार पिडीत महिला ही अकलूज येथील अकलाई हॉस्पिटल येथे काम करत होती. तिने उच्च शिक्षणासाठी ३५ हजार रूपये हॉस्पिटलकडून घेतले होते, ते पैसे पगारातून वजा करावेत अशी विनंती सदर पिडीत महिलेने हॉस्पिटलकडे केली होती. या हॉस्पिटलचे संचालक डॉ. भुषण भारत चंकेश्वरा, डॉ. सुनिल सुभाष नरूटे, डॉ. शैलेश भानुदास गायकवाड व डॉ. सचिन सावंत सर्व रा. अकलूज यांनी उसने दिलेले पैसे पगारातून न फेड करता, तु आमच्याशी शारीरीक संबंध ठेव, अशी त्या महिलेकडे मागणी करून फेब्रुवारी 2022 ते 28 जुन 2023 दरम्यान अकलाई हॉस्पिटलच्या डॉक्टर रूममध्ये सदर महिलेवर वारंवार अत्याचार केला असल्याची फिर्याद पिडीतेने अकलूज पोलीस ठाण्यात दि. 03 जानेवारी 2024 रोजी दिली. त्यावरून अकलूज पोलीसांनी चौघा डॉक्टरांविरोधात गु. र. नं. १०/२४, भादवि. ३७६/२, ५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.

या प्रकरणी सर्व डॉक्टरांनी गुन्हा दाखल होण्यापुर्वीच दि. 30 डिसेंबर 2023 रोजी माळशिरस न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली असता त्याच दिवशी सुनावणी होऊन न्यायालयाने सर्व डॉक्टरांना अंतिम सुनावणी दि. ९ जानेवारी होइपर्यंत तात्पुरता जामिन मंजुर केला असल्याची माहिती अकलूज पोलीसांनी दिली.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button