ताज्या बातम्या

शिवामृत भवन मंगल कार्यालयातून नवरा-नवरीचे अज्ञात चोरट्याने दागिने पळवले.

दोन वधू-वर यांचे सोने व चांदीचे दागिने लग्न मुहूर्ताच्या अगोदरच अज्ञात चोरट्यानी डल्ला मारला. 05 लाख 52 हजार 271 रुपये किमतीचे दागिने चोरीला गेले.

सदाशिवनगर (बारामती झटका)

सदाशिवनगर ता. माळशिरस येथील शिवामृत भवन मंगल कार्यालय या ठिकाणी नवरा नवरीचे अज्ञात चोरट्याने सहा लाखाचे दागिने पळवलेले असल्याने शिवामृत भवनमध्ये एकच धांदल उडाली. दोन वधू वर यांचे सोने व चांदीचे दागिन्यांवल लग्न मुहूर्ताच्या अगोदरच अज्ञात चोरट्याने डल्ला मारलेला आहे.

श्री. भारत बाजीराव कोळेकर रा. जळभावी, ता. माळशिरस यांचे द्वितीय चिरंजीव विनोद आणि श्री. उद्धव आप्पासो शेंडगे रा. वाटलूज, ता. दौंड, यांची सुकन्या चि. सौ. कां. तृप्ती आणि श्री. भारत बाजीराव कोळेकर रा. जळभावी, ता. माळशिरस यांचे तृतीय चिरंजीव विष्णू व श्री. सुरेश रामचंद्र वाघमोडे रा. बांगर्डे यांची सुकन्या चि. सौ. कां. दीप्ती यांचा शुभविवाह सोहळा शिवामृत भवन मंगल कार्यालय, पुणे-पंढरपूर रोड, सदाशिवनगर येथे शनिवार दि. 06/01/2024 रोजी दुपारी 02 वाजून 35 मिनिटे या शुभमुहूर्तावर संपन्न होणार होता.

नववधूंचे दागिने कोळेकर परिवार यांच्याकडे होते. त्यांनी नववधूंना सोन्याचे मंगळसूत्र, गंठण आदी दागिने, चांदीची जोडवी, पैंजण असे दागिने केलेले होते. नवरदेव यांना सोन्याच्या अंगठ्या असे सर्व दागदागिने असणारी पिशवी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्याने लंपास केलेली आहे. पिशवी गायब झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर शोधाशोध केली. परंतु, दागिने असणारी पिशवी हाती लागलेली नाही. अज्ञात चोरट्यांनी लंपास केलेली आहे. माळशिरस पोलीस स्टेशन येथे महावीर लक्ष्मण कोळेकर रा. जळभावी यांनी फिर्यादी जबाब देऊन सदरच्या घटनेविषयी तक्रार दाखल केलेली आहे. भारतीय दंड संहिता 1960 कलम 379 प्रमाणे माळशिरस पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद झालेला आहे. सदरच्या गुन्ह्यांमध्ये सोने व चांदीचे दागिने एकूण 05 लाख 52 हजार 271 रुपये किमतीचे अज्ञात चोरट्याने लंपास केलेले आहेत. माळशिरस पोलीस स्टेशन सदर गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

लग्न समारंभातील वधू आणि वर यांच्या परिवारातील सदस्यांनी मौल्यवान वस्तू व नववधूंचे दाग दागिने सांभाळण्याची गरज आहे. काही महिन्यापूर्वी भगवंत मंगल कार्यालय येथून नववधूचे व वरमाईचे सात तोळे दागिने व एक लाख रुपये रोख रक्कम असणारी पिशवी अज्ञात चोरट्याने गायब केलेली होती.

वास्तविक पाहता कार्यालयामध्ये सिसी कॅमेरे असणे गरजेचे आहे. जरी कॅमेरे असतील तरीसुद्धा वधू-वरांच्या नातेवाईकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

One Comment

  1. I do not even know how I ended up here but I thought this post was great I do not know who you are but certainly youre going to a famous blogger if you are not already Cheers

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button