ताज्या बातम्या

कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी महादेवराव केसकर उर्फ भाऊ यांचा सन्मान केला..

नातेपुते (बारामती झटका)

माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजीतसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी भारतीय जनता पार्टी सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष व डोंबाळवाडी कुरबावी गावचे माजी सरपंच महादेवराव केसकर उर्फ भाऊ यांचा वाढदिवसानिमित्त सन्मान केला. यावेळी भारतीय जनता पक्षाचे विशेष निमंत्रित सदस्य व माळशिरस नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष डॉ. आप्पासाहेब देशमुख, माळशिरस नगरपंचायतीचे विद्यमान नगराध्यक्ष व युवा उद्योजक सचिनआप्पा वावरे, भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष सुरेशभाऊ टेळे, भारतीय जनता पार्टीचे माळशिरस तालुका संघटन सरचिटणीस संजय देशमुख, डोंबाळवाडी गावचे ज्येष्ठ नेते व विश्वासू सहकारी नाना बुवा धायगुडे महाराज यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

डोंबाळवाडी कुरबावी गावचे सौजन्यशील व हसतमुख असणारे व्यक्तिमत्व महादेव मामा केसकर यांचा वाढदिवस 02 जुलै रोजी असतो. माळशिरस तालुक्याच्या नेते व कार्यकर्त्यांच्या सुसंवाद दौऱ्यावर कार्यतत्पर पाणीदार व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आलेले होते, त्यावेळेस सन्मान करण्यात आला.

भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांचे विश्वासू व निष्ठावान नेत्यांपैकी महादेव मामा केसकर आहेत. भारतीय जनता पार्टी सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागामध्ये भारतीय जनता पार्टीचे काम जोरात सुरू आहे. बोलका स्वभाव असल्याने माणसाला माणूस कायम जोडत असतात. समाजामध्ये त्यांना चांगले स्थान आहे. प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी आपल्या मुलांना शिक्षण देऊन ते सध्या नोकरी करीत आहेत.

राजासारखे मन मनासारखा राजा असे व्यक्तिमत्व असणारे महादेव मामा केसकर यांच्यावर सोशल मीडिया, फेसबुक, व्हाट्सअप व प्रत्यक्ष भेटून शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort