खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष फत्तेसिंह माने पाटील यांची महादेव कावळे यांची निवासस्थानी सांत्वनपर भेट.
स्वर्गीय कुमारी मयुरी महादेव कावळे हीचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झालेले आहे.
अकलूज (बारामती झटका)
माढा लोकसभा मतदारसंघाचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य फत्तेसिंह माने पाटील यांनी भारतीय जनता पार्टीचे अकलूज शहराध्यक्ष महादेव विजय कावळे यांची कन्या कुमारी मयुरी महादेव कावळे हिचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाल्याने कावळे परिवारांची सांत्वन पर भेट घेऊन दुःखामध्ये सहभागी नाईक निंबाळकर व माने पाटील परिवार झालेला आहे.
भारतीय जनता पक्षाचे कट्टर कार्यकर्ता व अकलूज भाजप शहराध्यक्ष महादेवराव कावळे यांना तीन मुली व एक मुलगा आहे. त्यामध्ये मयुरी गेल्यावर्षी दहावी इयत्तेमध्ये ९१ टक्के मार्क घेऊन उत्तीर्ण झालेली होती. अकरावीमध्ये शिकत होती. अचानक आजार झालेला असल्याने कावळे परिवार हवालदिल झालेले होते. हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होता. डॉक्टर सुद्धा हतबल झालेले होते. डॉक्टरांनी मयुरीला घरी घेऊन जाण्यास सांगितलेले होते तरीसुद्धा महादेव कावळे यांना आशावाद वाटत होता. अमेरिकेवरून चार लाख रुपयाचे औषध मागवलेले होते तरीसुद्धा, आजार गंभीर असल्याने उपयोग झाला नाही.
शेवटी ईश्वर सत्य पुढे इलाज नाही. “जो आवडे सर्वांना, तोची आवडे देवाला” या न्यायाप्रमाणे कुमारी मयुरीचा दुर्दैवी मृत्यू होऊन कावळे परिवार यांच्यावर शोककळा पसरलेली आहे. दुःखातून सावरण्याकरता अनेक राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मंडळी कावळे परिवार यांच्या दुःखामध्ये सहभागी होत आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.