खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीचा “खुटा” हालवून पुन्हा घट्ट केला.
माळशिरस (बारामती झटका)
माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भाजप व महायुतीची उमेदवारी मिळू नये, यासाठी शिवरत्न मोहिते पाटील तीन पिढ्या प्रयत्न करीत होते. मात्र, भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय व राज्यातील नेतृत्व यांनी पुनश्च पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी घोषित केलेली आहे. तरीसुद्धा, मोहिते पाटील परिवारातील सदस्य मतदार संघात भारतीय जनता पक्ष व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची प्रतिमा मलीन करीत असताना उलट खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीचा खुट्टा हलवून पुन्हा घट्ट केला, अशी राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या सहकार्याने माढा लोकसभा मतदारसंघात कार्यतत्पर व पाणीदार विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सिंचन, रस्ते, रेल्वे मार्ग, थांबे व विविध प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडून मार्गी लावले आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष व महायुती आणि खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची प्रतिमा उंचावलेली असताना मोहिते पाटील परिवार यांच्याकडून पक्ष व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची बदनामी सुरू आहे. माढा लोकसभा मतदारसंघात अपप्रचार सुरू असल्याने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा एक प्रकारे प्रचारच सुरू आहे. मोहिते पाटील यांचे मतदार संघातील पारंपारिक विरोधक असणारे यांच्या निवासस्थानी जाऊन भेटीगाठी सुरू आहे. त्यांच्यामध्येही उलट सुलट चर्चा सुरू आहे. सत्तेमध्ये असताना वागणूक कशा पद्धतीने होती याची कल्पना सर्वांना आहे.
आम्हीच राष्ट्रवादीचे संस्थापक, आमच्यामुळे पक्षाची स्थापना, घोषणा थांबवली होती म्हणत होता. मग आता त्याच राष्ट्रवादीचे तिकीट मिळावे म्हणून व नेहमी वाकडतोंड्या म्हणणाऱ्या पवार साहेबांच्या मागे लाईनीत का उभे रहात आहात, असेही आता लोक बोलू लागले आहेत.
त्यामुळे आत्ता त्यांच्यावर वेळ आल्यानंतर दारोदारी आमच्या दारी फिरत आहेत, याचा परिणाम होणार नाही. मात्र, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना अप्रत्यक्ष होणार आहे. मतदार संघात पक्षाने काहीच केले नाही, असे आठ दिवसापासून सुरू केलेले आहे. मात्र, यापूर्वी पाच वर्ष भाजप पक्ष कसा चांगला आहे, विकासाचा आहे असे सांगणारे अचानक यू टर्न कसा झाला, असाही विषय दबक्या आवाजात सुरू आहे. मोहिते पाटील यांनी सुरू केलेला खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व भाजपचा अपप्रचार पथ्यावर पडत आहे. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा परिचय नसलेले सुद्धा मोहिते पाटील यांचे विरोधक एकवटत असून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीचा खुट्टा हलवून पुन्हा घट्ट केला जात असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.