Uncategorizedक्रीडाताज्या बातम्यामनोरंजन

मोटेवाडी येथे श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त घेण्यात आलेल्या भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान उत्साहात संपन्न

मैदानाचे उदघाटन आ. राम सातपुते यांच्या शुभहस्ते तर, अर्जुनसिंह मोहिते पाटील, डॉ. आप्पासाहेब देशमुख, संकल्प डोळस, लक्ष्मण पवार, सचिन रणवरे, बाळासाहेब लवटे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न…

मोटेवाडी (बारामती झटका)

मोटेवाडी ता. माळशिरस येथे श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान उत्साहात पार पडले. सदर कुस्ती मैदानाचे उदघाटन लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या शुभहस्ते तर माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, माळशिरस नगरपंचायतीचे नगराध्यक्ष डॉ. आप्पासाहेब देशमुख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संकल्प डोळस, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व शिवामृत दूध संघाचे संचालक लक्ष्मण पवार, सचिन रणवरे, माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब लवटे आणि माळशिरस पंचायत समितीचे सदस्य पश्चिम भागाचे नेते गौतमआबा माने यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

सदर कुस्ती मैदानाचे आयोजन ग्रामपंचायत सदस्य व युवा उद्योजक महादेव माने यांनी केले होते. यावेळी पै. मनोज माने कुर्डूवाडी व पै. सतपाल सोनटक्के कंदर यांच्यात लढत लावण्यात आली होती. यामध्ये पै. सतपाल सोनटक्के हा पै. मनोज माने याच्यावर मात करत लखपती ठरला आहे.

हे मैदान यशस्वी करण्याकरिता ॲड. संजय माने, प्राध्यापक दादासाहेब खरात, काकासाहेब माने, आप्पा मोटे, राघू खरात, नाना देवकते, नवनाथ मोटे, गोरख माने, पंपू पालवे, श्रीकांत वायदंडे, ज्योतीराम दडस, नाना माने, विलास मोटे, नाना दडस, महादेव कोळेकर, बापू माने, लक्ष्मण रुपनवर, नवनाथ दडस, धनाजी सरगर, नितीन हांडे, मारुती माने, समाधान वायदंडे, समाधान माने, उत्तम मोटे, आप्पा देवकते, दादा कोळेकर, बाळू माने, शरद माने, तानाजी मोटे, नवनाथ माने, नामदेव हांडे, लक्ष्मण माने, धनाजी सरगर, मधुकर देवकते, दत्तू रुपनवर, दादा हुलगे, पोपट माने, विठ्ठल माने, नवनाथ पिसे, ज्ञानदेव कोळेकर, ज्ञानदेव खरात, अनिल माने, ऋतिक हांडे, साधू हांडे, पोपट सरगर, हनुमंत रामदास, राजेंद्र माने, राजेंद्र पालवे, सागर माने, आजिनाथ पालवे, बळवंत देवकते, काका देवकते, पोपट रुपनवर, पंपू माने, पांडुरंग तोरणे, श्रीकांत हांडे, धवन नामदास आदींनी परिश्रम घेतले. श्री सिद्धनाथ यात्रेत भव्य कुस्तीचे जंगी मैदान यशस्वीपणे संपन्न झाले. कुस्ती मैदानाचे समालोचन पै. हनुमंत शेंडगे मांडवे सदाशिवनगर यांनी केले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort