खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते विविध कामांचे भूमिपूजन, काही कामांचा लोकार्पण सोहळा व नूतन पदाधिकाऱ्यांचा सन्मान होणार…

माळशिरस नगरपंचायतीच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती…
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस नगर पंचायतीचे माजी नगराध्यक्ष डॉ. आप्पासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष शिवाजीराव देशमुख, उपनगराध्यक्षा सौ. कोमल जानकर, महिला बालकल्याण सभापती सौ. राणी शिंदे, महिला बालकल्याण उपसभापती सौ. रेश्मा टेळे या नूतन पदाधिकाऱ्यांचा सन्मान माढा लोकसभा मतदार संघाचे कार्यतत्पर पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते गुरुवार दि. ७/३/२०२४ रोजी दु. ४ वा. पवार वस्ती, ५८ फाटा (खंडोबा वस्ती) येथे संपन्न होणार आहे. तसेच माळशिरस तालुक्यातील काही विकास कामांचे भूमिपूजन तर काही कामांचा लोकार्पण सोहळा देखील कार्यतत्पर पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते होणार आहे. यावेळी माळशिरस नगर पंचायतीचे आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.


माढा लोकसभेचे कार्यतत्पर पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माळशिरस नगर पंचायतीला कोट्यावधी रुपयांचा निधी दिलेला आहे. या विकास कामांमधील काही कामांचे उद्घाटन होणार आहे, तर झालेल्या कामांचा लोकार्पण सोहळा कार्यतत्पर पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते होणार आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.