खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश…

फलटण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयास मंजुरी
फलटण (बारामती झटका)
माढा लोकसभा मतदारसंघाचे कार्यतत्पर पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नाने फलटण येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयास मंजुरी मिळाली असून आता फलटणची एक वेगळी ओळख निर्माण होणार आहे. सदरच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयास एम एच ५३, ५४ का ५५ नंबर मिळतोय याकडे लक्ष लागून राहिले आहे.
राज्य शासनाने आज शासन निर्णय करून फलटणला भाडेतत्त्वावर किंवा शासनाची मालकीची जागा घेऊन ताबडतोब हे कार्यालय सुरू करावेत, असे आदेश दिले आहेत. फलटणच्या जनतेने बऱ्याच वर्षांपासून पाहिलेले स्वप्न कार्यतत्पर पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पूर्ण केल्यामुळे सातारला जाणारा लोकांचा ओघ कमी झाला आहे. लायसन असेल, इतर कामासाठी व वाहनधारकांना किंवा आरटीओ एजंट यांना आता साताराला जावे लागणार नाही. त्यामुळे वेळेची व पैशाची मोठी बचत होणार आहे. कार्यतत्पर पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटणमध्ये अनेक विकास केले. त्यामध्ये हे एक अत्यंत महत्त्वाचे विकासाचे पुढचे पाऊल आहे. त्यामुळे जनतेमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.