ताज्या बातम्याराजकारण

श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक दत्तूकाका रणवरे यांना व्हॉईस चेअरमन पदाची पुन्हा “हुलकावणी”

माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील मोहिते पाटील परिवार यांच्याशी तीन पिढ्या एकनिष्ठ असणारे घराणे पदापासून वंचित राहिले…

सदाशिवनगर (बारामती झटका)

माळशिरस तालुक्याचे भाग्यविधाते सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या सुरुवातीच्या राजकारणापासून माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील मोहिते पाटील परिवार यांच्याशी तीन पिढ्या एकनिष्ठ असणारे घराणे पदापासून वंचित राहिलेले आहे. श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे सलग दुसऱ्यांदा असणारे संचालक मांडकी गावचे माजी सरपंच व माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील मोहिते पाटील समर्थक असणारे दत्तू काका रणवरे यांना व्हाईस चेअरमन पदाची पुन्हा हुलकावणी बसलेली आहे. त्यामुळे माळशिरस तालुक्यात राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू आहे.

महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्री शंकर सहकारी साखर कारखाना प्रगतीपथावर आहे. सदरच्या कारखान्याची निवडणूक पार पडलेली असून सदरच्या कारखान्याचे चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक झालेली आहे. चेअरमन आमदार रणजितसिंह मोहिते पाटील तर व्हाईस चेअरमन ॲड. मिलिंद कुलकर्णी यांची बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे.

श्री शंकर सहकारी साखर कारखाना बंद होता त्यावेळेस सदरचा कारखाना अवसायानात निघालेला होता. सहकारी साखर कारखाना असणारा खाजगी मालकाच्या ताब्यात जाणार होता, त्यावेळेस न्यायालयीन लढाई लढत असताना दत्तूकाका रणवरे यांची महत्त्वाची भूमिका होती. विजयसिंह मोहिते पाटील व जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली न्यायालयीन लढाई जिंकून सदरच्या कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक झालेली होती. त्यावेळेला दत्तूकाका रणवरे संचालक होते. त्याही वेळेला दत्तूकाका रणवरे यांना व्हाईस चेअरमन एक वर्षाकरिता करतील अशी माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील मोहिते पाटील समर्थक व राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू होती. परंतु, पाच वर्षाचा कालावधी संपलेला होता. दुसऱ्यांदा पंचवार्षिक निवडणूकीत जुने चार, पाच संचालक यांना संधी मिळालेली होती. त्यामध्ये दत्तूकाका रणवरे यांचाही समावेश होता.

माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील मोहिते पाटील परिवार यांच्याशी तीन पिढ्या एकनिष्ठ असणारे मांडकी गावचे घराणे आहे. त्या घराण्यातील दत्तूकाका रणवरे यांना व्हाईस चेअरमन पदाची संधी मिळेल, अशी कारखाना पंचक्रोशीत चर्चा सुरू होती. मात्र व्हाइस चेअरमन पदाची पुन्हा हुलकावणी बसलेली असल्याने माळशिरस तालुक्यात राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort