खंडकरी शेतकऱ्यांचे नेते ॲड. सोमनाथ आण्णा वाघमोडे यांची आझाद मैदान, मुंबई येथील खंडकरी शेतकरी संतोष पाटील यांच्या उपोषणाला सदिच्छा भेट…
मुंबई (बारामती झटका)
लोणंद-फलटण-पंढरपूर रेल्वे संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष खंडकरी शेतकऱ्यांचे नेते ॲड. सोमनाथ अण्णा वाघमोडे यांनी गुरसाळे, ता. माळशिरस येथील खंडकरी शेतकरी संतोष माणिकराव पाटील याचे दि. 30/09/2024 पासून आझाद मैदान, मुंबई येथे उपोषण सुरू आहे. आझाद मैदान मुंबई येथे खंडकरी शेतकऱ्यांचे नेते ॲड. सोमनाथअण्णा वाघमोडे यांनी खंडकरी शेतकरी संतोष माणिकराव पाटील यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस करून उपोषणासंबंधी कागदपत्रांची माहिती घेतली. यावेळी युवा उद्योजक अमोलशेठ यादव उपस्थित होते.
सदर निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, श्री माणिक हरि पाटील या खंडकरी शेतकरी यांचा वारसदार आहे. दि. १३/०८/२०१३ रोजी आदेश क्रमांक ७४/२०१३ हा मिळालेला आहे. या संदर्भात मी व माझी आई इंदूबाई माणिक पाटील यांनी वारंवार प्रांत ऑफिस अकलुज येथे तोंडी व लेखी आदेशाप्रमाणे कब्जा मिळावा, अशी विनंती करुनसुध्दा कब्जा न दिल्यामुळे शेवटी माझ्या आईने १५ जानेवारी २०१४ रोजी आत्मदहन केले व त्यासंदर्भात शिक्षा हि भोगली. पण, अद्याप आम्हाला आदेशाप्रमाणे पूर्णपणे कब्जा मिळालेला नाही.
तसेच मुलीवर अन्याय झाला असून अद्यापपर्यंत आरोपीला शिक्षा मिळाली नाही. वारंवार पाठपुरावा करूनसुद्धा प्रशासनाने दखल घेतली नाही. अनेक मागण्यांसाठी त्यांनी प्रयत्न करूनसुद्धा प्रशासनाकडून प्रतिसाद आला नाही. त्यामुळे संतोष पाटील यांनी प्रशासनाला जाग आणण्यासाठी शेवटी आमरण उपोषण सुरु केले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
http://www.kejari-pemalang.com
LINK SITUS SLOT GACOR SERVER THAILAND 2024 SCATTER HITAM LNK DAFTAR
Üsküdar lavabo tıkanıklığı Tuvalet tıkanıklığı için çağırdım, kısa sürede sorunu hallettiler. Teşekkür ederim. https://melds.eu/blogs/6295/%C3%9Csk%C3%BCdar-WC-T%C4%B1kan%C4%B1kl%C4%B1%C4%9F%C4%B1-A%C3%A7ma