कु. राजनंदिनी वाघमोडे हिची सोलापूर येथे झालेल्या जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून विभागीय स्पर्धेसाठी निवड

माळशिरस (बारामती झटका)
कु. राजनंदिनी सचिन वाघमोडे हिची सोलापूर येथे झालेल्या जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून विभागीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल कन्या प्रश्नाला, माळशिरस या ठिकाणी संस्थेचे अध्यक्ष अजय पाटील यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेचे प्राचार्य वाघमोडे सर, शहाजी देशमुख, सचिन वाघमोडे, सर्व शिक्षक, कर्मचारी वृंद उपस्थित होते. या स्पर्धेसाठी प्रशालेचे टेळे सर, काशीद सर यांचे मार्गदर्शन लाभले.
दि. 13/12/2023 रोजी सोलापूर येथे झालेल्या शालेय जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेमध्ये Y.U.S.F च्या विद्यार्थ्यांनी भरभरून यश मिळवले. सदर स्पर्धेमध्ये कु. राजनंदिनी सचिन वाघमोडे हिने 16 ते 20 वजन गटांमध्ये प्रथम क्रमांक मिळवून विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली.
अन्वी लोखंडे हिने 50 ते 53 वजन गटांमध्ये द्वितीय क्रमांक मिळवला. भाग्यश्री काशिद हिने 46 ते 49 वजन गटामध्ये द्वितीय क्रमांक मिळवला. तर, रुमाना सय्यद हिने 59 ते 63 वजन गटामध्ये द्वितीय क्रमांक मिळवला. तसेच तृतीय क्रमांक समृद्धी काशिद हिने 46 ते 49 वजन गटामध्ये तृतीय क्रमांक मिळवला. तर या स्पर्धेमध्ये नम्रता वनवे हीने बेस्ट फाइटर म्हणून कौशल्य मिळवले. या यशस्वी सर्व विद्यार्थ्यांना ग्रँडमास्टर श्री. प्रकाश काशिद सर यांनी मार्गदर्शन केले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.