ताज्या बातम्या

चि. मयुरेश पांढरे पाटील, नातेपुते आणि चि. सौ. कां. साक्षी दडस, सदाशिवनगर यांचा शाही शुभविवाह सोहळा संपन्न होणार…

आपले स्नेहांकित – श्री. पोपट कृष्णा पांढरे पाटील, श्री. गणपत कृष्णा पांढरे पाटील

नातेपुते (बारामती झटका)

श्री. गणपत कृष्णा पांढरे पाटील यांचे नातू व श्री. सुरेश गणपत पांढरे पाटील उर्फ अण्णा पांढरे पाटील रा. नातेपुते, ता. माळशिरस, यांचे सुपुत्र चि. मयुरेश पांढरे पाटील आणि स्वर्गीय किसन महादेव दडस यांची नात व श्री. मोहन किसन दडस रा. सदाशिवनगर, ता. माळशिरस, यांची सुकन्या चि. सौ. कां. साक्षी दडस यांचा शाही शुभविवाह सोहळा रविवार दि. 17/12/2023 रोजी दुपारी 12 वाजून 35 मिनिटे या शुभ मुहूर्तावर चैतन्य मंगल कार्यालय, नातेपुते-दहिगाव रोड, काळे पेट्रोल पंपासमोर, माळशिरस, ता. माळशिरस येथे संपन्न होणार आहे.

तरी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आपले स्नेहांकित श्री. पोपटराव कृष्णा पांढरे पाटील, श्री. गणपत कृष्णा पांढरे पाटील यांनी केलेले आहे.

सप्तपदीच्या प्रदक्षिणा, हळदी कुंकवाच लेणं, नाजूक अक्षदांचा सुखद वर्षाव आणि मणीमंगळसूत्राचं पावित्र्य घेऊन संपन्न होणारा सोहळा म्हणजे दोन जीवांच्या वैवाहिक जीवनाचा शुभारंभ. अशा या मंगल प्रसंगी आपण सहकुटुंब सहपरिवार येऊन वधूवरांना शुभाशीर्वाद द्यावेत. लग्नाच्या घाईगडबडीत आपणांस हस्ते परहस्ते आमंत्रण अथवा निमंत्रण न मिळाल्यास हेच निमंत्रण समजून येण्याचे अगत्य करावे, असे समस्त पांढरे पाटील परिवार यांच्या वतीने नम्र आवाहन करण्यात येत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button