लातूर येथे तिसरे फातिमाबी शेख मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन.
अकलूज (बारामती झटका)
ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्थेच्या वतीने भारतातील पहिल्या मुस्लिम मराठी शिक्षिका युग स्त्री फातिमाबी शेख यांच्या जयंतीनिमित्त एकदिवसीय तिसरे फातिमाबी शेख मुस्लिम मराठी साहित्य संमेलन रविवार दि. १२ जानेवारी रविवार रोजी भालचंद्र ब्लड बँक, गांधी मार्केट लातूर या ठिकाणी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे
या एकदिवसीय साहित्य संमेलनाचे चार सत्रामध्ये आयोजन करण्यात आले आहे. सकाळच्या प्रथम सत्रात उद्घाटन व कर्तृत्वान महिलांना फातिमाबी शेख पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. दुसऱ्या सत्रामध्ये परिसंवादाचे आयोजन केले आहे. तिसऱ्या सत्रामध्ये मान्यवर कविचे कविसंमेलन होणार आहे व शेवटचे समारोप सत्राचे आयोजन केले आहे.
ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था आयोजित पहिले फातिमाबी शेख मुस्लिम मराठी साहित्य संमेलन पुणे येथे आयोजीत केले होते तर दुसरे साहित्य संमेलन सोलापूर येथे संपन्न झाले तर तिसरे साहित्य संमेलन लातूर येथे आयोजीत केले आहे. सदर साहित्य संमेलन आयोजनाचा उद्देश हा प्राचीन आणि अर्वाचीन मराठी साहित्यात अनेक मुस्लिम मराठी संत, कवी आणि साहित्यिकांचे योगदान राहिलेलेआहे. मराठी भाषिक मुस्लिम समाज महाराष्ट्राच्या संत, पुरोगामी, परिवर्तनवादी परंपरेचा वारसा सातत्याने अभिव्यक्त व्हावा. मराठी भाषेतून मुस्लिम साहित्यिकांनी लिहिलेल्या साहित्यावर विचार मंथन व्हावे. मुस्लिम मराठी साहित्याचा, समाजाचा प्रवाह अधिक वृद्धिंगत करणे, मुस्लिम समाजाच्या व्यथा, वेदना, दुःख आणि अस्मितेची जाणीव साहित्यातून मांडणे, मुस्लिम समाजाविषयीचे समज, गैरसमज दूर करण्याच्या हेतूने संमेलन प्रयत्नशील आहे. मुस्लिम समुदायातून राज्य लिहिणाऱ्या अनेक लेखकांना नवे विचारपीठ उपलब्ध करून देणे आणि साहित्याच्या माध्यमातून समाजामध्ये सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि वैचारिक सौहार्दाचे वातावरण निर्माण करण्यासाठी या संमेलनाचे आयोजन केले आहे. या संमेलनाला लातूरमधील साहित्यावर प्रेम करणाऱ्या सर्व मंडळींनी उपस्थित रहावे, असे आवाहन ग्रामीण मस्लिम मराठी साहित्य संस्थेचे अध्यक्ष ॲड. हाशम इस्माईल पटेल, संमेलनाचे स्वागताध्यक्ष इस्माईल शेख, ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्थेचे संस्थापक शेख शफी बोल्डेकर, उपाध्यक्ष खाजाभाई बागवान, सहसचिव अनिसा सिकंदर शेख, लातूर जिल्ह्याच्या अध्यक्षा तहेसिन सय्यद, कार्याध्यक्ष नदिम कादरी, उपाध्यक्ष ॲड. इकबाल शेख, सचिव ॲड. सिमा पटेल, रमेश हनमंते, कासार रशिद, रसुल पठाण, कलिम शेख, मतिन अब्बासी, जाफर शेख, जब्बार पटेल, डॉ. म. रफी शेख, महासेन प्रधान यांनी केले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.