अकलूज नगर परिषद निवडणुकीत भाजपने उच्चशिक्षित सुसंस्कृत सौ. पूजा कोतमीरे यांच्या रूपाने नगराध्यक्ष पदाचा उमेदवार दिला…

पालकमंत्री जयकुमार गोरे मा. आमदार राम सातपुते, माजी सनदी अधिकारी शैलेश कोतमिरे यांचा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीत मास्टरस्ट्रोक…
अकलूज (बारामती झटका)
आशिया खंडातील सर्वात मोठी समजली जाणारी अकलूज ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेमध्ये रूपांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच अकलूज नगर परिषदेची निवडणूक होत आहे. महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री ना. जयकुमार गोरे, भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार मा. आमदार राम सातपुते, प्रशासनात पारदर्शक व लोकाभिमुख प्रशासक म्हणून उल्लेखनीय काम करणारे माजी सनदी कर्तव्यदक्ष अधिकारी शैलेश कोतमिरे यांनी अकलूज नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीत मास्टर स्ट्रोक दिलेला आहे. अकलूज नगर परिषद निवडणुकीत भाजप व महायुतीकडून उच्चशिक्षित सुसंस्कृत सौ. पूजा करण कोतमीरे यांच्या रूपाने नगराध्यक्ष पदाचा उमेदवार दिलेला आहे..
अकलूज नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष व नगरसेवक यांनी अकलूज गावचे ग्रामदैवत अकलाई देवीचा आशीर्वाद घेऊन श्रीफळ वाढविण्यात आला. यावेळी माजी आमदार राम सातपुते, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अध्यक्ष फत्तेसिंह माने पाटील, भाजपचे प्रांतिक सदस्य राजकुमारनाना पाटील, श्रीराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भाजपचे ज्येष्ठ नेते प्रकाशबापू पाटील, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सचिव सोपान काका नारनवर, माजी सनदी अधिकारी शैलेश कोतमीरे, अकलूज शहराध्यक्ष महादेवराव कावळे, यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी व अकलूज, माळेवाडी शहरातील भाजप महायुतीचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अकलूज येथील विजय चौकातून शक्ती प्रदर्शन करीत वाजत गाजत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. कर्मवीर बाबासाहेब माने पाटील, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उन्हाचा तडाखा असताना सुद्धा नेते, उमेदवार व कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष होता. हलग्यांचा कडकडाट व कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडलेला होता. विजय चौक ते अकलूज नगर परिषद कार्यालय या रस्त्याच्या दुतर्फा अकलूजकर नागरिकांनी गर्दी केलेली होती. माजी आमदार राम सातपुते व नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. पूजा करण कोतमीरे, उमेदवारी अर्ज भरण्याकरता जात असताना मतदारांना हात जोडून आशीर्वाद घेत होते. अकलूजच्या इतिहासात प्रथमच प्रस्थापितांच्या विरोधात शक्ती प्रदर्शन करीत भाजप व महायुतीने उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहे.

अकलूज येथील विजय चौकात कोतमीरे परिवार यांचे वास्तव्य आहे. कोतमीरे परिवार उच्चशिक्षित व व्यावसायिक आहेत. प्रामाणिकपणे व्यवसाय करून समाजामध्ये कोतमीरे परिवार यांनी आपला वेगळा ठसा उलटविलेला आहे. समाजात प्रतिष्ठित व्यक्ती, व्यावसायिक, डॉक्टर, दुकानदार, व्यापारी, शेतकरी त्यांच्याशी सलोख्याचे, मैत्रीचे व जिव्हाळ्याचे संबंध आहेत. अकलूज नगर परिषदेत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. पूजा करण कोतमिरे यांचा जन्म, बालपण व शिक्षण हे सातारा जिल्ह्यात झालेले आहे. एम. कॉम. शिक्षण झालेल्या पूजा यांचा अकलूज येथील करण यांच्याशी विवाह झालेला आहे. करण कोतमिरे सध्या बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये कार्यरत आहेत. कोतमीरे परिवाराचे मार्गदर्शक व आधारस्तंभ असणारे माजी सनदी अधिकारी शैलेश कोतमिरे यांनी प्रशासनामध्ये पारदर्शक व उत्कृष्ट कामगिरी करून समाजामध्ये आपला नावलौकिक कायम ठेवलेला आहे. याचाही फायदा भाजप व महायुतीच्या नगराध्यक्षांसह नगरसेवक यांना सुद्धा होणार आहे.
केंद्रात नरेंद्रजी मोदी, राज्यात देवेंद्रजी फडणवीस यांच्या विचाराचे सरकार असल्याने पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे, लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज नगर परिषदेच्या विकासासाठी भरपूर निधी उपलब्ध केला जाणार आहे. अकलूजमध्ये घराघरात भाजपचे कमळ चिन्ह रुजवण्याचे काम भाजपचे अकलूज शहराध्यक्ष महादेवराव कावळे व अकलूज शहरातील शाखा अध्यक्ष, उपाध्यक्ष व पदाधिकारी यांनी केलेले आहे. याचाही फायदा नगरपरिषद निवडणूकीमध्ये होणार आहे. सर्व राजकीय परिस्थिती पाहता अकलूज नगर परिषद निवडणुकीत भाजपने उच्चशिक्षित सुसंस्कृत सौ. पूजा कोतमीरे यांच्या रूपाने नगराध्यक्ष पदाचा उमेदवार देऊन पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी आमदार राम सातपुते, माजी सनदी अधिकारी शैलेश कोतमीरे यांनी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीचा मास्टरस्टोक दिला असल्याची स्थानिक नागरिक व राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



