ताज्या बातम्याराजकारण

लोकांचं लेकरू आपलं म्हणायची सवय मोहिते पाटलांना, अशी माढा विधानसभा मतदार संघात चर्चा सुरू आहे…

मुल कोणाचेही असो बारसं आपणच घालायचं, असा प्रकार पाहावयास मिळत आहे मतदार संघात उलटसुलट चर्चा सुरू..

महाळुंग (बारामती झटका)

मोहिते पाटील यांना आता लोकसभेची मोठी स्वप्न पडू लागली आहेत. माढा विधानसभा मतदारसंघाचे पाणीदार आमदार बबनदादा शिंदे यांनी माढा विधानसभेत समाविष्ट असणाऱ्या माळशिरस तालुक्यातील 14 गावांसाठी जिल्हा परिषद सोलापूर यांच्या समाज कल्याण विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांचा विकास करणे, या योजने अंतर्गत लवंग 5 लाख, मिरे 5 लाख, जांबुड 15 लाख, उंबरे वेळापूर 5 लाख, बोरगाव 10 लाख, खळवे 10 लाख रुपये एकूण 50 लाख रुपये एवढा निधी उपलब्ध करून आणला आहे.

त्याचं श्रेय मोहिते पाटील घेत आहेत, त्यामुळे असं वाटतं आहे की, लोकाचं लेकरू आपलं म्हणायची सवय मोहिते पाटलांना लागली आहे की काय…., अशी चर्चा माढा विधानसभा मतदारसंघात रंगलेली आहे.

पाणीदार आमदार बबनदादा शिंदे यांनी माढा विधानसभा मतदारसंघातील गावांना निधी मिळावा, यासाठी पत्रव्यवहार केलेला होता. पत्राच्या अनुषंगाने निधी मंजूर झालेला आहे तोपर्यंत प्रसार माध्यमांना आपणच मंजूर केले असल्याचे दर्शविलेले आहे. त्यामुळे मूल कोणाचेही असो बारसं आपणच घालायचं असा प्रकार पहावयास मिळत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

One Comment

Leave a Reply

Back to top button