माळशिरस येथे विविध विकासकामांचा भूमिपूजन समारंभ संपन्न होणार
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आ. यशवंत तात्या माने यांच्या शुभहस्ते भूमिपूजन समारंभ
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस नगरपंचायत येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन समारंभ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार यशवंततात्या माने यांच्या शुभहस्ते रविवार दि. १०/०३/२०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता ज्ञानदेव देशमुख कुस्ती केंद्र, अहिल्यादेवी होळकर चौक, माळशिरस येथे संपन्न होणार आहे.
तसेच यावेळी सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना भाळवणी चे चेअरमन कल्याणराव काळे आणि सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुरेशआबा पारवे पाटील यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न होणार आहे.
तरी या भूमिपूजन समारंभ प्रसंगी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन माळशिरस नगरपंचायतीचे नूतन नगराध्यक्ष शिवाजीराव देशमुख, उपनगराध्यक्षा सौ. कोमल जानकर, सर्व नगरसेवक व नगरसेविका यांच्यावतीने करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.