ताज्या बातम्याराजकारण

माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विजयासाठी माळशिरस तालुक्यातील जुन्या भाजपा पदाधिकारी यांनी कंबर कसली

माळशिरस (बारामती झटका)

माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक येत्या ७ मे रोजी होत आहे. यासाठी महायुतीचे उमेदवार म्हणजेच भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे. या उमेदवाराच्या विजयासाठी माळशिरस तालुक्यातील भाजपचे निष्ठावंत व पहील्यापासुन भाजपचे काम करणारे पदाधिकारी यांनी उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विजयासाठी कंबर कसली असुन तालुक्यातील प्रत्येक गावा गावात जाऊन ते प्रभावीपणे प्रचार करीत आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्य तसेच खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय दमदार आमदार रामभाऊ सातपुते यांनी केलेली विकासकामे समजून सांगुन देशात भाजपचेच सरकार येणार, पुन्हा एकदा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार आहेत. यामुळे माढा लोकसभा मतदारसंघातुन सुद्धा भाजपचाच खासदार निवडुन दिल्यास पुढच्या पाच वर्षात विकासकामांना गती मिळेल. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विजयासाठी माळशिरस तालुक्यात आतापर्यंत ६३ गावामध्ये कॉर्नर बैठकीचे नियोजन करून प्रवास केला आहे. उर्वरित दोन दिवसात पूर्ण करण्यात येणार आहे.

यावेळी माळशिरस तालुका निवडणूक प्रमुख के. के. पाटील, संयोजक बाळासाहेब सरगर, धनगर कृती समितीचे अध्यक्ष हनुमंत सूळ, प्रदेश सचिव सोपान नारनवर, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब वावरे, संघटन सरचिटणीस संजय देशमुख, नगरसेवक आकाश सावंत, किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष महादेव केसकर, युवा नेते धर्मराज माने, उपाध्यक्ष प्रवीण कदम, युवा मोर्चाचे उपाध्यक्ष यूवराज वाघमोडे, अमर मगर, मिनीनाथ मगर हे रात्रंदिवस रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी माळशिरस तालुक्यात प्रचार यंत्रणा राबवित आहेत.

मांडवे येथील आ. रामभाऊ सातपुते यांनी घेतलेल्या मेळाव्यात धर्मा माने हया कार्यकत्याला आमदार प्रेमाने, धर्मा तु भाजपसाठी काम करायचे असे बोलताना म्हणाले होते. पण, सोशल मीडियावर याविषयी आमदारांनी दमदाटी केली, अशी चर्चा सुरु होती. पण, सध्या हेच धर्मा माने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा रात्रंदिवस प्रचार करीत आहेत.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button