खंडकरी शेतकरी वारसांवर अन्याय; आझाद मैदानावर आमरण उपोषण
गुरसाळे (बारामती झटका)
गुरसाळे ता. माळशिरस, येथील श्री. संतोष माणिक पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महसूल मंत्री व आझाद मैदान पोलीस स्टेशन, मुंबई यांना निवेदन दिले आहे. त्यानुसार त्यांनी आजपासून उपोषणाला सुरुवात देखील केली आहे.
सदर निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, श्री माणिक हरि पाटील या खंडकरी शेतकरी यांचा वारसदार आहे. दि. १३/०८/२०१३ रोजी आदेश क्रमांक ७४/२०१३ हा मिळालेला आहे. या संदर्भात मी व माझी आई इंदूबाई माणिक पाटील यांनी वारंवार प्रांत ऑफिस अकलुज येथे तोंडी व लेखी आदेशाप्रमाणे कब्जा मिळावा, अशी विनती करुन सुध्दा कब्जा न दिल्यामुळे शेवटी माझ्या आईने १५ जानेवारी २०१४ रोजी आत्मदहन केले व त्यासंदर्भात शिक्षा हि भोगली. पण, अद्याप आम्हाला आदेशाप्रमाणे पूर्णपणे कब्जा मिळालेला नाही.
तरी, माझ्या खालीलप्रमाणे मागण्या आहेत –
१) माझ्या नाबालिक मुलीची दि. ०२/०५/२०२६ रोजी च्या घटनेची अत्याचाऱ्या विषयी ई-तक्रार केली होती. त्यानंतर पुन्हा स्मरण ई-तक्रार करुन सुध्दा नातेपुते पोलीस स्टेशनचे महारूद्र परजने साहेबांनी अद्याप दखल घेतलेली नाही. त्याची दखल घेण्यात यावी.
२) माझा मुलगा ओम संतोष पाटील यावर दबाव आणून एफ आर नंबर १७७ हि नोंद करुन घेतली. त्यानंतर त्यात माझ्या जबाब दि. १५/०९/२०२४ रोजीची दखल अद्याप घेतलेली नाही. त्याची दखल घेण्यात यावी.
३) या संबंधीत घटनेची सखोल चौकशी करुन संबंधीत अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
४) आदेश क्र. ७४/२०१३ दि. १३/०८/२०१३ रोजी मिळालेला आहे. आज रोजी पर्यंत पूर्णपणे कब्जा मिळाला नाही. ९० टक्के अतिक्रमण काढून दिले आहे. व १० टक्के राहीले आहे. ते काढून देण्यात यावे.
५) गुरसाळे गट नं. ६५६ आदेशात असूनसुद्धा आजपर्यंत ७/१२ बनवलेला नाही, तो मिळावा.
६) शंकर विठोबा गायकवाड रा. गुरसाळे हा गुरसाळे गट नं ६५५ व चंद्रकांत बाबूराव गायकवाड व इतर हा गुरसाळे गट नं ६५६ हे ५० वर्षे वहिवाट होते व ते तसे कोर्टात लिहून देलेले आहे. कोर्टानी ते मान्य न करुन ५०/२०१३ हा निकाल त्यांच्या विरोधात दिलेला आहे. तरी शेती महामंडळ शिवपरी यांनी यांच्यावर कारवाई केलेली नाही. म्हणून शेती महामंडळाच्या अधिकाऱ्यावर व शंकर विठोबा गायकवाड व चंद्रकांत बाबूराव गायकवाड यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
७) माळशिरस भुमिअभिलेख मोजनीदार नेमुन यांनी २०२१ रोजी चुकीची व रेकॉर्ड प्रमाणे न दिल्यामुळे त्यांच्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
८) दि. ०७/०६/२०२३ रोजी प्रांत साहेबांच्या आदेशानुसार भुमिलेख माळशिरस यांनी हद्दी खुणा करून दिलेल्या आहे. व ते मान्य आहेत, असा माझ्याकडून जवाब लिहून घेण्यात आलेला आहे. व त्यानंतर कब्जा दिलेला आहे. पण मला अद्याप भूमिलेख माळशिरस यांनी मोजणीचे क पत्र दिलेले नाही. ते क पत्र मिळावे.
९) या वरील सर्व कारणावरुन माझे स्वत:चे मानसिक व आर्थिक फार मोठे नुकसान झालेले आहे. त्याची भरपाई त्या त्या संबंधीत अधिकाऱ्यांकडून वसूल करुन मला नुकसान भरपाई देण्यात यावी.
या वरील सर्व मागणीवरुन मी श्री. संतोष माणिक पाटील आझाद मैदान येथे दि. 30/9/24 रोजी आमरण उपोषणासाठी बसणार आहे. माझ्या सर्व मागण्या मान्य होईपर्यंत मी उपोषणावरुन उठणार नाही. त्या दरम्यान माझ्या जिवीतास बरे वाईट झाले तर त्याची सर्व जबाबदारी तुमची राहील. असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यामुळे सर्व प्रशासन हादरून गेले आहे. या उपोषणावर काय प्रतिक्रिया होते, याकडे तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
LINK SITUS SLOT GACOR HARI INI Slot Gacor
Joint Genesis Reviews, Pricing, and bonuses visit here: joint genesis
wyq74z
Pink Withney I very delighted to find this internet site on bing, just what I was searching for as well saved to fav
Joint Genesis Reviews, Pricing, and bonuses visit here: joint genesis