माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माने पाटील परिवारांची सांत्वनपर भेट घेतली…

माळशिरस तालुक्याच्या जडणघडणीतील धर्मवीर सदाशिवराव माने पाटील यांच्या धर्मपत्नी श्रीमती लीलावती माने पाटील यांचे दुःखद निधन…
अकलूज (बारामती झटका )
माळशिरस तालुक्याच्या जडणघडणीतील त्रिमूर्तीपैकी धर्मवीर सदाशिवराव माने पाटील उर्फ सदुभाऊ यांच्या धर्मपत्नी श्रीमती लीलावती माने पाटील यांचे सोमवार दि. 11 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी दुःखद निधन वयाच्या 96 व्या वर्षी झालेले होते. त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात सायंकाळी 04.30 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आलेले होते. माने पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. माने पाटील यांच्या दुःखात सहभागी होण्याकरिता माढा लोकसभेचे विद्यमान खासदार रणजीतसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी माने पाटील यांच्या माळशिरस अकलूज रोडवरील, बागेवाडी, पाटील वस्ती येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी श्रीमती लीलावती माने पाटील यांचे चिरंजीव हिंदुराव माने पाटील, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्येष्ठ नेते फत्तेसिंह माने पाटील यांच्यासह माने पाटील परिवारातील सदस्य व नातेवाईक उपस्थित होते.

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या समवेत सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व भाजपचे सोलापूर जिल्हा सहप्रभारी के.के. पाटील उपस्थित होते.
लोकनेते स्वर्गीय खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर व माने पाटील परिवार यांचे ऋणानुबंधाचे संबंध होते. स्वर्गीय हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या पश्चात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी वडिलांचा वारसा व वसा जपलेला आहे. स्वर्गीय श्रीमती लीलावती माने पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून नाईक निंबाळकर परिवारांच्यावतीने भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng