कृषिवार्ताताज्या बातम्याराजकारण

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व पाणीदार आमदार बबनदादा शिंदे यांच्या कामगिरीवर शेतकरी यांच्यामधून आनंदाचे व समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

जांभूड (बारामती झटका)

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व माढा विधानसभेचे पाणीदार आमदार बबनदादा शिंदे यांनी  सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील माढा विधानसभा मतदार संघातील जांभूड गावचा अनेक दिवसाचा प्रलंबित प्रश्न सोडविलेला असल्याने अजितदादा व बबनदादा यांच्या कामगिरीवर शेतकरी यांच्यामधून आनंदाचे व समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. जांभूड विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन युवानेते राहुल खटके यांच्या मार्गदर्शनाखाली कर्तव्यदक्ष सरपंच सौ. स्वाती राहुल खटके यांनी शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा असणारा जांभूड येथील नवीन ३३ केव्ही सबस्टेशन मंजूर केलेले असल्याने जांभूड पंचक्रोशीत बळीराजा सुखावला आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची सोलापूर जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीत पडसाळी, अरण, भेंड, वरवडे, परिते, जाधववाडी या गावांमध्ये अतिरिक्त पॉवर ट्रान्सफॉर्मर बसवण्यात येणार आहे. तर पंढरपूर तालुक्यातील चिलाईवाडी व माळशिरस तालुक्यातील जांभूड येथे अतिरिक्त उपकेंद्र मंजूर करण्यात आले. याशिवाय करमाळा तालुक्यातील वांगी येथे नवीन उपकेंद्र देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मंत्रालयात माढा, करमाळा, पंढरपूर, माळशिरस या तालुक्यामधील महावितरणशी संबंधित प्रलंबित कामांचा तसेच नवीन कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला. या बैठकीस आ. संजयमामा शिंदे हे दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आशिष शर्मा, ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, मुख्य अभियंता प्रवीण परदेशी आदी अधिकारी ही बैठकीला उपस्थित होते.

रोहित्रांची क्षमता वाढ करण्याच्या सूचना
राज्यात सद्यस्थितीत सुधारित वितरण क्षेत्र योजनेअंतर्गत वितरण प्रणालीचे सक्षमीकरण व आधुनिकीकरणाची कामे हाती घेण्यात येत आहे. या अंतर्गत नवीन उपकेंद्रे उभारणे, उपकेंद्रांची क्षमतावाढ, नवीन उच्चदाब वाहिन्या, नवीन वितरण रोहित्रे, विद्यमान वितरण रोहित्रांची क्षमतावाढ यासारखे कामे करण्यात येणार असल्याचे सांगितले.

लोकप्रतिनिधींनी सांगितलेली कामे तातडीने पूर्ण करा
लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार संबंधित भागातील उपकेंद्रांचे प्रलंबित काम पूर्ण करणे, उपकेंद्रांची क्षमतावाढ करणे आणि नवीन उपकेंद्र मंजूर करणे आदी कामे हाती घेऊन प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिले. या बैठकीत सोलापूर जिल्ह्यातील विविध प्रलंबित कामांवर चर्चा करण्यात आल्याचेही सांगण्यात आले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

5 Comments

  1. I have been surfing online more than three hours today, yet I
    never found any interesting article like yours.
    It’s pretty worth enough for me. In my opinion, if all website owners
    and bloggers made good content as you did, the internet will be a
    lot more useful than ever before.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button