माढा लोकसभेच्या निवडणुकीची संक्रांत घोड्यावर का सिंहावर बसणार ?
माळशिरस (बारामती झटका)
देशाच्या लोकसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झालेली आहे. देशात व राज्यात लोकसभा मतदारसंघात शांतता आहे. मात्र, माढा लोकसभा मतदारसंघात निवडणुकीपूर्वीच खासदार कोण होणार ?, भारतीय जनता पक्ष कोणाला तिकीट देणार ?, याविषयी सोशल मीडियावर धुमाकूळ सुरू आहे. खऱ्या अर्थाने हिंदू संस्कृतीमध्ये संक्रांतीच्या सणाला महत्त्व आहे. काही वेळेला संक्रांतीचा मुहूर्त शुभ व अशुभ मानला जातो. वाईट घडणाऱ्या घटनेला संक्रांत बसली अशी म्हण प्रचलित आहे. सध्या संक्रांतीचे वाहन घोडा असून उपवाहन सिंह आहे. त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघात नेमकी संक्रांत घोड्यावर ?, का सिंहावर बसणार ?, अशी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे.
मकरसंक्रांत रविवार दि. 14 जानेवारी 2024 म्हणजेच शके 1945 पौष शुद्ध उत्तररात्री 2.42 वाजता सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे. संक्रांतीचा पुण्यकाळ सोमवार दि. 15 जानेवारी 2024 रोजी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आहे. सूर्याचे मकर संक्रमण विशिष्ट कारणावर होत असल्याने वाहन घोडा असून उपवाहन सिंह आहे. तिने काळे वस्त्र परिधान केले असून हातात भाला घेतलेला आहे. हळदीचा टिळा लावलेला आहे. वयाने वृद्ध असून बसलेली आहे. वासाकरिता दूर्वा घेतलेल्या आहेत. चित्रान्न भक्षण करीत आहे. ब्राह्मण जाती आहे. भूषणार्थ सोने धारण केले आहे. वारनांव घोरा व नक्षत्र नाव महोदरी असून सामुदाय मुहूर्त पंधरा आहेत. उत्तरेकडून दक्षिणेस जात आहे व नैऋत्य दिशेस पहात आहे.
माढा लोकसभा मतदारसंघात संक्रांत घोड्यावर बसली तर सिंह दिल्लीला जाणार आणि सिंहावर बसली तर घोडा दिल्लीला जाणार अशी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे. खऱ्या अर्थानेही उत्तरेकडून दक्षिणेकडे जात असताना नैऋत्य दिशेस पहात असल्याने माढा लोकसभा मतदारसंघाच्या जनतेतील खासदार होईल अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. बारामती झटका वेब पोर्टल वाचकांची संख्या दोन कोटी व बारामती झटका यूट्यूब चैनल प्रेक्षकांची संख्या एक कोटी अशा सर्व प्रेक्षक वाचक हितचिंतक मित्रपरिवार या सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !!! तिळगुळ घ्या गोडगोड बोला धन्यवाद…
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.